IAF Chief On China : चिथावणीखोर कारवाईला भारतीय लढाऊ विमाने उत्तर देतील; लष्करी चर्चेपूर्वी हवाईदल प्रमुखांचा चीनला इशारा
IAF Chief On China : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या 16 व्या लष्करी चर्चेपूर्वी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Vr Chaudhari ) यांनी चीनला इशारा दिला आहे.
IAF Chief On China : पूर्व लडाखमधील सीमेवरील तणावाबाबत भारत आणि चीन यांच्यात लष्करी चर्चेची 16 वी फेरी सुरू आहे. दरम्यान, चिथावणीखोर कारवाईवर भारतीय लढाऊ विमाने चीनला प्रत्युत्तर देतील, असा इशारा एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Air force Chief Vr Chaudhari ) यांनी दिला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सची लढाऊ विमाने सीमेजवळ येतील त्यावेळी भारतीय हवाई दल त्यांना तत्काळ प्रत्युत्तर देईल. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लढाऊ विमाने सज्ज असतील, असे व्हीआर चौधरी यांनी म्हटले आहे.
भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या 16 व्या लष्करी चर्चेपूर्वी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत व्हीआर चौधरी यांनी हा इशारा दिला आहे. "चिनी विमानांवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. चिनी लढाऊ विमाने भारतीय सीमेजवळ येत असल्याची माहिती मिळताच आम्ही देखील आमची लढाऊ विमाने तैनात करू, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
व्हीआर चौधरी म्हणाले, "चीनच्या कृत्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांनी चिथावणीखोर कारवाई केली तर त्याला उत्तर देण्यास तयार आहोत. गलवान खोऱ्यातील घटनेनंतर आम्ही पूर्व लडाख प्रदेशाच्या सीमेवर रडार तैनात करण्यास सुरुवात केली आहे."
"हवाई दलाने उत्तरेकडील सीमेवर जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता वाढवली आहे. याशिवाय एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा पाकिस्तानसोबत चीनच्या सीमेवर तैनात करण्यात येत आहे. पूर्व लडाख सेक्टरमध्ये सीमेवर रडार यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच भारतीय हवाई दल चिनी विमाने आणि हालचालींवर बारीक नजर ठेवून आहेत, अशी माहिती चौधरी यांनी यावेळी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या