(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाला हरवण्यासाठी ब्रिटन भारतासोबत...100 व्हेटिंलेटर अन् 95 ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची पहिली खेप दाखल
भारतावर आलेल्या या कठीण संकटाच्या वेळी ब्रिटन भारतासोबत 'एक मित्र आणि साथी' च्या रूपात उभा असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्ससन यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता भारताला ब्रिटनची साथ मिळत असून ब्रिटनने 100 व्हेन्टिलेटर आणि 95 ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची मदत पोहोच केली आहे. ब्रिटनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचा हा पहिला टप्पा असून अजून मोठी मदत लवकरच भारतात येणार असल्याचं ब्रिटनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोरोना को हराने के इस जंग में यू. के. भारत के साथ है।
— Alex Ellis (@AlexWEllis) April 27, 2021
Delighted that the first batch of UK medical supplies have now arrived in India to protect the most vulnerable from #COVID19 #ForceForGood | #LivingBridge | https://t.co/Jl5zYqYlLj pic.twitter.com/oQHODbbls4
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ब्रिटन हा 'एक मित्र आणि साथी' च्या रूपात भारतासोबत आहे असंही ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने भारताला 600 हून अधिक महत्वाचे साहित्य पाठवण्याचे आश्वासन दिलं आहे.
Urgent medical supplies sent by the UK have now arrived in India.
— UK in India🇬🇧🇮🇳 (@UKinIndia) April 27, 2021
These supplies will help to save lives in the country & will help to protect the most vulnerable.
Only through global cooperation can we fight the coronavirus pandemic. pic.twitter.com/e13239VWwO
ब्रिटन हा भारताचा 'मित्र आणि साथी'
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, भारतावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी त्या देशाला मदत म्हणून शेकडो व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर भारतात पाठवण्यात येणार आहेत. ब्रिटन या काळात भारताचा 'एक मित्र आणि साथी' म्हणून काम करेल.
गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या तीन लाख 23 हजार 144 नव्या रुग्णांची भर पडली तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 28 लाख 82 हजार 204 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दोन लाख 51 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- लस उत्पादक कंपन्यांच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचे धोरण भेदभावजनक; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा आरोप
- EC Bans Counting Day Celebrations : निवडणूक निकालानंतर कोणत्याही जल्लोषावर निवडणूक आयोगाची बंदी; 5 राज्यांतील मतमोजणीपूर्वी आयोगाच्या सूचना
- Corona: भारतातील कोरोना परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी; देशातील दुसऱ्या लाटेवर WHO कडून चिंता व्यक्त