एक्स्प्लोर
... तर विराटही दडपणाखाली येईल: ट्रेव्हर बेलिस
विराट कोहलीनं एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावूनही, टीम इंडियाला 31 धावांनी हार स्वीकारावी लागली.
लंडन: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त फॉर्मात असला तरी आपल्या सहकाऱ्यांच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तोही दडपणाखाली येऊ शकतो, असं मत इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी व्यक्त केलं आहे.
विराट कोहलीनं एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावूनही, टीम इंडियाला 31 धावांनी हार स्वीकारावी लागली.
विराटच्या दोन्ही खेळी सर्वोच्च दर्जाच्या असल्याचं बेलिस यांनी मान्य केलं. ते म्हणाले की, विराट हा सध्याचा एक सर्वोत्तम फलंदाज आहे. पण उर्वरित चार कसोटी सामन्यांमध्ये आम्ही भारताच्या इतर फलंदाजांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परिणाम विराटवरही नक्की होऊ शकतो.
कोहली नंबर वन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा विराट कोहली हा आजवरचा सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रमवारीत नंबर वन ठरलेला तो पहिला भारतीय फलंदाज आहे. सचिननं 2011 सालातल्या जून महिन्यात अव्वल स्थान मिळवलं होतं. विराट कोहलीनं एजबॅस्टन कसोटीत झळकावलेल्या शतकाचा आणि अर्धशतकाचा त्याला नंबर वन मिळवण्यासाठी मोठा लाभ झाला.
इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली
इंग्लंडनं टीम इंडियाचा दुसरा डाव 162 धावांत गुंडाळून एजबॅस्टन कसोटीत 31 धावांनी विजय साजरा केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचा हा एक हजारावा कसोटी सामना होता. त्यामुळं हजाराव्या कसोटी सामन्यात अवघ्या सव्वा तीन दिवसांत मिळालेला विजय ज्यो रूट आणि त्याच्या इंग्लिश आर्मीसाठी अविस्मरणीय ठरावा. या कसोटीत टीम इंडियासमोर विजयासाठी चौथ्या डावात 194 धावांचं लक्ष्य होतं. पण भारतीय संघाला चौथ्या डावात त्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणंही झेपलं नाही.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी - 1 ऑगस्ट, बर्मिंगहॅम
दुसरी कसोटी - 9 ऑगस्ट- लॉर्ड्स, लंडन
तिसरी कसोटी- 18 ऑगस्ट- ट्रेन्ट ब्रिज
चौथी कसोटी- 30 ऑगस्ट- द रोज बोऊल, साऊथेम्पटन
पाचवी कसोटी- 7 सप्टेंबर- केनिंग्टन ओवल (द ओवल), लंडन
इंग्लंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीस बुमरा, शार्दूल ठाकूर
संबंधित बातम्या
भारताची इंग्लंडविरुद्ध ‘कसोटी’, इतिहास काय सांगतो?
इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी, ऋषभ पंतला संधी, करुण नायरचं कमबॅक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement