Vice President Election 2022 : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार, 19 जुलै अर्ज करण्याची अंतिम मुदत
Vice President Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच उपराष्ट्रपती पदाची निवडणुकही जाहीर झाली आहे.
Vice President Election 2022 : देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. तर 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती शपथ घेतील. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच उपराष्ट्रपती पदाची निवडणुकही जाहीर झाली आहे. सहा ऑगस्ट 2022 रोजी उपराष्ट्रपती पदाची होणार आहे. 19 जुलै अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. दरम्यान, सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते. दोन टर्म ते या पदावर राहिले. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळही पाच वर्षांसाठी असतो. ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात.
सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडून मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Election to the Office of the Vice President to be held on 6th August 2022.
— ANI (@ANI) June 29, 2022
पात्रता काय?
1. उमेदवार भारतीय नागरिक असावा
2. वय 35 वर्ष पूर्ण असावे
3. ती व्यक्ती लोकसभा अथवा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.
4. देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
अपात्रता -
1. भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार
2. ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.
3. ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.
4. ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.