Coronavirus Updates : कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम; गेल्या 24 तासात 35 हजार रुग्णांची भर, 260 जणांचा मृत्यू
Coronavirus Updates : देशात सर्वाधिक रुग्णसंख्या केरळमध्ये वाढत असून गेल्या 24 तासात त्या ठिकाणी 26 हजार 200 नव्या रुग्णांची भर पडली तर 125 जणांचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार जरी दिसत असला तरी अद्याप कोरोनाच्या संकटाचे ढग कायम आहेत. गेल्या काही दिवासांपासून देशातील रुग्णसंख्या ही 30 ते 40 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात 34 हजार 976 नव्या रुग्णांची भर पडली तर 260 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 37,681 जण कोरोनामुक्त झाले. काल एकाच दिवसात देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही जवळपास तीन हजारांनी कमी झाली. त्या आधी बुधवारी देशात देशात 43,263 कोरोनाबाधितांची भर पडली होती तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता.
केरळमध्ये कोरोनाचे संकट कायम
केरळमध्ये कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात येताना दिसत नाही. गेल्या 24 तासात केरळमध्ये 26 हजार 200 नव्या रुग्णांची भर पडली तर 125 जणांचा मृत्यू झाला.
Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 55 जणांचा मृत्यू
देशातील कोरोनाची सद्यस्थिती :
- कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 31 लाख 74 हजार 954
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 23 लाख 42 हजार 299
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 90 हजार 646
- एकूण मृत्यू : चार लाख 42 हजार 009
- एकूण लसीकरण : 72 कोटी 37 लाख 84 हजार 586 लसीचे डोस
राज्यातील स्थिती
राज्यात गुरुवारी 4,219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तसेच 55 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी 2 हजार 538 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 95 हजार 236 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के इतकं आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4010 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1206 दिवसांवर गेला आहे.