Coronavirus Updates : काळजी घ्या! देशात 15 हजार 815 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आलेख घसरला
Corona cases Today : देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्याची देशातील कोरोनाची परिस्थिती सविस्तर जाणून घ्या.
Coronavirus Cases Updates : देशात गेल्या काही दिवसांपासून वाढता कोरोना संसर्ग पाहता दिलासादायक बातमी आहे. देशातील कोरोना संसर्गाचा आलेख घसरला आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी 746 रुग्णांची घट झाली आहे. तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 19 हजार 264
सध्या भारतात 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 20 हजार 18 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 20,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 4.36 टक्के आहे.
#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 8, 2022
➡️ Over 87.81 Cr COVID Tests conducted so far.
➡️ Weekly Positivity Rate currently at 4.64%.
➡️ Daily Positivity Rate stands at 6.14%. pic.twitter.com/m9Zp7uABIO
मुंबईत शुक्रवारी 871 रुग्णांची नोंद
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 871 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत शुक्रवारी 445 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,06,933 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,663 झाली आहे. सध्या मुंबईत 3,243 सक्रिय रुग्ण आहेत.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 13, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/n7inKDx6hu pic.twitter.com/ThDsMDqg8n
महाराष्ट्रात 1904 रुग्ण कोरोनामुक्त
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1975 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात एकूण 1904 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात शुक्रवारी पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79 लाख 8 हजार 195 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.