India Pakistan War: आधी वायूदल अन् नौदल आता भारताच्या आर्टिलरी फोर्सचा पराक्रम, बॉर्डरवरील पाकड्यांचे बंकर्स उडवून टाकले, अनेक सैनिकही ठार
India Pakistan War: भारतीय सैन्याने काल रात्रीपासून पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय हवाईदल, नौदल आणि तोफखान्याने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले आहे.

India Pakistan War: पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमारेषेवरील 15 ठिकाणी जोरदार हवाई हल्ला चढवला होता. ड्रोन्स, रॉकेट लाँचर्स आणि क्षेपणास्त्र असा तिहेरी हवाई हल्ला पाकिस्तानी सैन्याने (Pakistan Army) चढवला होता. मात्र, भारताच्या एस 400 एअर डिफेन्स सिस्टीम आणि एल 70 गन, Zu-23mm या अँटी एअरक्राफ्ट मशीनगन्स आणि शिल्का यंत्रणेने पाकिस्तानचा हा एअरस्ट्राईक (Air Strike) उधळून लावला. दुसरीकडे भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या युद्धनौकांनी पाकिस्तानच्या कराची बंदारवर हल्ला चढवला होता. तर भारताच्या वायूदलाने (Indian Air force) काल रात्रभर पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करुन शत्रूला सळो की पळो करुन सोडले होते. अशातच आता भारतीय लष्कराच्या पायदळाने आणि तोफखाना म्हणजे आर्टिलरी फोर्सनेही मोठी कामगिरी केल्याची माहिती समोर आली आहे.
काल रात्रीपासून सीमारेषेवरील राजौरी, उरी, सांब आणि पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. या सर्व ठिकाणी पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरु होता. सीमारेषेलगत असणाऱ्या नागरी वस्त्यांवर पाकिस्तानकडून उखळी तोफांचाही मारा करण्यात आला होता. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
भारताच्या आर्टिलरी फोर्सने जोरदार मारा करत सीमारेषेलगत असणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त झाले आहेत. पाकिस्तानच्या हाजरा, बटल, मदरपूर आणि ट्रेटी नोट भागातील अनेक पाकिस्तानी बंकर्स भारताने नष्ट केले आहेत. भारतीय तोफखान्याच्या या जोरदार माऱ्यात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. या भागात पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाले आहे. काल हवाई हल्ल्याच्यावेळीही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं, 45 क्षेपणास्त्रे आणि तब्बल 60 ड्रोन्स पाडले होते.
इस्लामाबाद आणि कराचीत भारताचा हल्ला
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई दलाला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानमध्ये मुसंडी मारली होती. भारताच्या ड्रोन्स विमानांनी पाकिस्तानच्या लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा, पेशावर या प्रमुख शहरांवर हल्ले चढवले. या सर्व ठिकाणी रात्रभर स्फोट सुरु होते. तर 1971 नंतर भारताने पहिल्यांदाच कराची बंदरावर हल्ला चढवला. भारताच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेने कराची बंदरावर क्षेपणास्त्रं डागून ते बेचिराख केल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
रात्री जिरली नाही पाकिस्तानने सकाळी पुन्हा हल्ला चढवला, भारतीय सैन्यानं पुन्हा पोतं भरुन धूळ चारली























