India Warning To Pakistan : पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन निंदनीय, सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश : विक्रम मिसरी
पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन निंदनीय, सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश : विक्रम मिसरी

नवी दिल्ली : भारताच्या विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला खडसावलं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं हे निंदनीय असल्याचं विक्रम मिसरी यांनी म्हटलं.
विक्रम मिसरी म्हणाले....
गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. भारतीय सैन्याकडून याचं उत्तर दिलं जात आहे. या सीमेवरील अतिक्रमणाचा सामना करत आहे. हे अत्यंत निंदनीय असून पाकिस्तान याला जबाबदार आहे. पाकिस्ताननं हे गांभीर्यानं घ्यावं आणि अतिक्रमण रोखण्यासाठी तातडीनं योग्य कारवाई करावी. सैन्याचं यावर योग्य लक्ष आहे. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी आणि रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही तासांपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान केलं जातंय. दोन्ही देशांच्या डीजीएमओकडून करण्यात घेण्यात आलेल्या निर्णयाचं उल्लंघन करण्यात आलं आहे.
भारताचा पाकिस्तानला इशारा
भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या आक्रमणावर लक्ष ठेवलेलं आहे. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी ठोस आणि कडक पावलं उचलण्याचे आदेश दिले गेले आहेत, अशी माहिती विक्रम मिसरी यांनी दिली आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत ही शस्त्रसंधी आहे का? असा सवाल केला होता. श्रीनगरमधील व्हिडीओ शेअर करत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आणलं होतं.
पाकिस्तानचा बनाव विदेश मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून वारंवार उघडा पाडला जात आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतानं आता पाकिस्तानला अखेरचा इशारा दिला आहे. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करु नये. पाकिस्ताकडून जे अतिक्रमण होत आहे ते रोखण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असा इशारा विक्रम मिसरी यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडलं, पाकिस्तानचा हट्टीपणा
पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्याकडून भारताशी संवाद साधला गेला होता. दोन्ही देशांच्या डीजीएमओकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सैन्य कारवाया रोखण्याचा करार झाला होता. त्याचं गेल्या काही तासांपासून पाकिस्तानी सैन्याकडून उल्लंघन होत आहे. भारतीय सैन्य याचं उत्तर देत आहे. पाकिस्ताननं या स्थितीला गांभीर्यानं समजून घ्यावं, असं विक्रम मिसरी यांनी म्हटलं आहे. भारतीय सैन्याला अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस आणि कठोर उत्तर देण्याचे अधिकार भारतीय सैन्याला दिल्याचं मिसरी यांनी म्हटलं आहे.
























