पाकिस्तान भारतासाठीच नाहीतर मानवतेसाठीही धोकादायक, आम्ही घाबरलो नाही, सीमावर्ती भागात राहणाऱ्या मुस्लिमांना काय वाटतं?
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीला दोन दिवस उलटले आहेत. आता जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण सीमावर्थी भागात राहणाऱ्या मुस्लिम लोकांना नेमकं काय वाटतं? याबाबतची माहिती पाहुयात.

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीला (India Pakistan Ceasefire) दोन दिवस उलटले आहेत. आता जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतू, राजस्थानच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या मुस्लिमांना पाकिस्तानवर अजिबात विश्वास नाही. पाकिस्तान हा दुटप्पीपणा दाखवणारा देश आहे. मानवतेसाठी तो देश धोकायदायकआहे. त्यामुळं आपण सतर्क राहिलं पाहिजे असे मत सीमावर्ती भागात राहणाऱ्या मुल्सिमांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचा इतिहास वाईट आहे. आम्ही त्यांना अजिबात घाबरलो नाही. कारण भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत शूर सैनिक तिथे आहेत तोपर्यंत पाकिस्तान आमचे कोणतेही नुकसान करु शकत नाही. जैसलमेरचे मुस्लिम म्हणतात की त्यांना त्यांच्या सैन्याचा आणि सरकारचा अभिमान आहे. गरज पडल्यास आम्ही पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढण्यास आणि त्याला योग्य धडा शिकवण्यासही तयार आहे.
पाकिस्तान हा नेहमीच फसवणूक करणार देश
भारत पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील जैसलमेरमध्ये राहणारे लोकांनी देखील पाकिस्तानबाबत वाईट अनुभव असल्याचे सांगितले. पाकिस्तान हा नेहमीच फसवणूक करणार देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावल्याचे लोकांनी सांगितले.
पाकिस्तान मानवतेसाठीच धोकादायक
सीमावर्ती भागातील मुस्लिम लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात राहणारे सर्व लोक आपापसात भाऊ आहेत. जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व भारतीय आपले मतभेद विसरून एकत्र उभे राहतात. याबद्दल कोणीही गैरसमज बाळगू नये. तर पाकिस्तान हा केवळ भारतासाठीच नाही तर मानवतेसाठीही एक मोठा धोका आहे आणि तो नष्ट केला पाहिजे असे मतही अनेक लोकांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या युद्धजन्य India Pakistan war) परिस्थितीला विराम मिळाला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू झाली आहे. मात्र, शस्त्रसंधी लागू केल्यानंतर देखील पाकिस्तानकडून भारतावरक ड्रो हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच सीमेवर गोळीबार देखील करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानचे खरे रंग जगासमोर आले होते. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी जरी झाली असली तरीह अद्याप पाकिस्तानला दिलासा मिळाला नाही. कारण भारताने अनेक गोष्टींवरील बंदी कायम ठेवली आहेत. त्यामुळं पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:























