युद्धबंदीच्या घोषणेनं पाठ थोपटून घेतली, आता काश्मीर प्रश्नावर ट्रम्प यांच्याकडून मध्यस्थीची ऑफर; भारताची प्रतिक्रीया काय?
भारताने आता ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे सांगत पाकिस्तानला ठणकावलय .पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफ गोळे डागले जातील असा स्पष्ट संदेश पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला दिलाय

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराच्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काश्मीरवर एक महत्त्वाचे विधान केले आहे. रशिया -युक्रेन आणि इस्रायल - हमास युद्ध थांबवण्यात अपयशी ठरलेले ट्रम्प आता काश्मीर प्रश्न सोडवण्याबद्दल बोलले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं 'हजारो वर्षानंतर काश्मीर प्रश्नावर तोडगा निघू शकतो का ते पाहणार असल्याचं विधान त्यांनी केलं . काश्मीर प्रश्न मध्यस्थी करण्याची ऑफर दिल्यानंतर पाकिस्तान कडून या ऑफरचे स्वागत करण्यात आले असले तरी काश्मीर प्रश्नी कोणीही मध्यस्थी करू नये असे भारतानेही स्पष्ट केले . (Kashmir Issue)
अमेरिकेने जर युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर पाठ थोपटले असली तरी युद्धबंदीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा गृहमंत्री अमित शहा ,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यापैकी कोणीही शस्त्रसंधी बाबत कोणतेही वक्तव्य केलं नव्हतं .युद्ध बंदीच्या घोषणेच्या तीन तासानंतर पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवत शस्त्र संधीचे उल्लंघन केल्याचे दिसले .दरम्यान भारताने आता ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे सांगत पाकिस्तानला ठणकावलय .पाकिस्तान मधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफ गोळे डागले जातील असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलाय .अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नाही तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्र संधीची घोषणा केल्याची माहिती आहे .
हजार वर्षानंतर मी काश्मीरवर तोडगा काढेन : ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ताज्या पोस्टमध्ये काश्मीरचा उल्लेख करत लिहिले की , "मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकला . अगदी चर्चेशिवायही . मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार वाढवणार आहे . याशिवाय हजार वर्षांनंतर काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी ही मी तुम्हा दोघांसोबत काम करेन .भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या कामासाठी देव पाठीशी राहील असेही ट्रम्प यांनी म्हटले .
भारताची प्रतिक्रीया काय?
काश्मीरवर आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे .फक्त एकच मुद्दा शिल्लक आहे तो पाक व्याप्त काश्मीर परत करण्याबाबत .बोलण्यासारखे दुसरे काहीही नाही .जर दहशतवाद्यांना ताब्यात देण्याबद्दल ते बोलत असतील तर आम्ही बोलू शकतो .आमचा इतर कोणत्याही विषयावर दुसरा कोणताही हेतू नसल्याचं भारताच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं . या विषयात आम्हाला कोणीही मध्यस्थी करावी असे वाटत नाही .मध्यस्थी करण्याची गरज नसल्याची ही भूमिका भारताने घेतलीय
पाकिस्तानने ट्रम्प यांच्या ऑफरचे केले स्वागत
काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान मध्ये मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ऑफरचे पाकिस्तानने रविवारी स्वागत केले .युद्धबंदीच्या चर्चेत अमेरिकेने बजावलेल्या रचनात्मक भूमिकेचे कौतुक करत पाकिस्तानने त्यांच्या एका निवेदनात म्हटलं की, " जम्मू आणि काश्मीर वाद सोडवण्याचा उद्देशाने केलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या तयारीचे आम्ही कौतुक करतो " पाकिस्तानी पुढे म्हंटले की हा एक जुना मुद्दा आहे आणि दक्षिण आशिया आणि त्यापलीकडे शांतता आणि सुरक्षेवर त्याचे गंभीर परिणाम आहेत .जम्मू आणि काश्मीर वादाचा कोणत्याही न्याय आणि कायमस्वरूपी तोडगा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संबंधित ठरावानुसार असला पाहिजे .काश्मिरी लोकांच्या मूलभूत हक्कांचे पूर्तता सुनिश्चित केली पाहिजे . असेही पाकिस्तान सरकारने म्हटले आहे .
हेही वाचा:























