एक्स्प्लोर

India Pak War : भारताविरुद्ध लढा राहिला पाकिस्तानातच गृहकलह सुरु, शाहबाज शरिफ यांच्या विरोधात आंदोलनाचा भडका

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली :  भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं काल रात्री भारतामधील 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतानं त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची HQ9 ही प्रणाली उद्धवस्त करुन टाकली होती. भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम प्रणालीपुढं पाकिस्तानचा निभाव लागला नव्हता. तरी देखील भारतावर हल्ला करण्याचं भ्याड धाडस पाकिस्ताननं केलं. पाकिस्तानला हा प्रयत्न देखील महागात पडला आहे. भारताच्या पश्चिम सीमेवरील राज्यांमध्ये पाकिस्ताननं ड्रोन, मिसाईल आणि विमानांद्वारे हल्ला करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला. मात्र, भारताच्या एस-400 एअर डिफेन्स प्रणालीनं पाकिस्तानच्या मिसाईल, ड्रोन आणि विमानांना पाडलं आहे. भारताविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ आणि सेनाप्रमुख असीम मुनीर अडचणीत आले आहेत. 

पाकिस्तानच्या सेनादलाचा प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या आंदोलन सुरु झालं आहे. बलुचिस्तान येथील बलुच लिबरेशन आर्मीनं शाहबाज शरीफ यांच्या  विरोधात आंदालन करत त्यांना हटवण्याची मागिणी केलीय. तर, बलुचिस्तान फ्रीडम फायटर्सकडून पाकिस्तानवरच हल्ला करण्यात आला आहे. यामुळं पाकिस्तान दुहेरी अडचणीत सापडला आहे. 

पाकिस्तानच्या सेना प्रमुखाची उचलबांगडीची शक्यता 

पाकिस्तानचा सेना प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये त्याला ताब्यात घेऊन देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी आर्मीकडून जनरल शहीर शमशाद मिर्झा याच्याकडे सेना प्रमुखपद सोपवलं जाऊ शकतं. असीम मुनीर यानं वैयक्तिक अजेंड्यापोटी पाकिस्तानाला विनाशाच्या मार्गावर नेलं. मुनीरला ताब्यात घेत त्याला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. असीम मुनीर याच्यावर लष्करी कोर्टाकडून कारवाई केली जाऊ शकते. इमरान खानला देखील लवकरच तुरुंगातून बाहेर काढलं जाऊ शकतं.  इमरान खानच्या समर्थकांनी त्याला सोडण्याची मागणी सुरु केली आहे. त्याचवेळी अमेरिकेनं देखील पाकिस्तानला परिस्थिती आणखी बिघडवू नका, असा इशारा दिला आहे. 

भारताने पाकिस्तानच्या 16 शहरांवर हल्ला

भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबादसह लाहोर, सियालकोट सारख्या 16 शहरांवर हल्ला केला आहे. एकीकडे वायू दलाचा आणि लष्कराचा हल्ला तर दुसरीकडे नौदलानेही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतानं केलेल्या पलटवारामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. भारतानं  कराची पासून लाहोरपर्यंत हल्ले केले आहेत. तर, इस्लाबादपासून एबोटाबादपर्यंत हल्ले केले आहेत.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget