National Crime Records Bureau : कोराना मृत्यूंपेक्षा भारतात आत्महत्यांमुळं मृत्यूची संख्या अधिक, धक्कादायक आकडेवारी समोर
National Crime Records Bureau : धक्कादायक बाब म्हणजे, गेल्यावर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षी 13 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.
National Crime Records Bureau : चांगल्या आरोग्याचा अर्थ फक्त निरोगी शरीर नव्हे. यामध्ये मानसिक आरोग्याचाही (Mental Health) समावेश होतो. कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) काळात तो व्यक्ती प्रत्येक लढाई जिंकतो. ज्याला आपलं मन मजबूत कसं करायचं माहित असतं. मात्र, ज्याचं मन कमकुवत असतो, तो एकतर थकतो अन्यथा पराभव मान्य करतो. आयुष्यात निराशा येते. त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं जाते. अन् आयुष्य संपवतात. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (National Crime Records Bureau) आकडेवारीत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. वर्षभरात कोरोना महामारीपेक्षा जास्त मृत्यू आत्महत्यानं झाल्याचं या आकडेवारीवरुन समोर आलं आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतात एक लाख 53 हजार 52 जणांनी आत्महत्या केली आहे. याच कालावधीत देशात कोरोना महामारीमुळे एक लाख 49 हजार जणांचा मृत्यू झालाय. मागील दहा वर्षांमध्ये 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. 2020 वर्षांमध्ये रेट ऑफ सुसाइड 11.3 इतका आहे. तर गतवर्षी हा रेट ऑफ सुसाइड 10.4 इतका होता. 2019 मध्ये एक लाख 39 हजार जणांनी आत्महत्या केली होती. 2018 मध्ये एक लाख 34 हजार तर 2017 मध्ये एक लाख 29 हजार जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षी 13 टक्के आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडू 11 टक्के आणि मध्य प्रदेश 9.5 टक्के या राज्यांचा समावेश आहे.
मजुरांचे प्रमाण अधिक –
आत्महत्या करणार्यांमध्ये मजुरांचं प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल मजुरांचं झालं होतं. गेल्यवर्षी 37 हजार 666 मजुरांनी आत्महत्या केली होती. एखादा आजार असताना आत्महत्या कऱणाऱ्यांची संख्या 27 हजारांपेक्षा जास्त आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांचं अधिक प्रमाण –
गतवर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचं अधिक प्रमाण असल्याची नोंद आहे. गतवर्षी झालेल्या सर्व आत्महत्यापैकी 71 टक्के पुरुष असल्याचं या आकडेवारीत समोर आलं आहे. तर आत्महत्या करणाऱ्या 50 टक्के महिला या गृहणी असल्याचं या आकडेवारीत दिसतेय. 12 हजार विद्यार्थी आणि 10 हजार शेतकऱ्यांनी गतवर्षी आपलं आयुष्य संपवलं.
बेरोजगारांमध्ये नोकरी-बिजनेस करणाऱ्यांच्या अधिक आत्महत्या –
धक्कादायक बाब म्हणजे, बेरोजगार लोकांपेक्षा नोकरी करणाऱ्या अथवा बिजनेस करणाऱ्यांनी अधिक आत्महत्या केल्या आहेत. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटीजनेही गतवर्षी आपलं आयुष्य संपवलं. ज्यामध्ये सुशांतसिंह राजपूतचं नावाचाही समावेश आहे.
2020 मध्ये भारतात एक लाख 53 हजार 52 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. राज्याचा विचार करताना महाराष्ट्रातील लोकांचं यामध्ये सर्वाधिक प्रमाण दिसतेय. माहराष्ट्रामध्ये जवळपास 20 हजार जणांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.