Inflation : सणासुदीच्या तोंडावर महागाईत मोठी घट, औद्योगिक विकास दरात वाढ
Retail inflation : खाद्य पदार्थांच्या महागाई दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने त्याचा परिणाम एकूण महागाई दरावर झाला असल्याचं दिसून येतंय.
मुंबई : दसरा, दिवाळीच्या तोंडावर सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतातील किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation) हा गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक कमी म्हणजे 4.35 टक्के इतका झाला आहे. खाद्य पदार्थांच्या महागाई दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने त्याचा परिणाम एकूण महागाई दरावर झाला असल्याचं दिसून येतंय. तसेच औद्योगिक विकास दरात वाढ झाली असून तो 11.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
खाद्य पदार्थांच्या महागाईचा दर हा कन्झ्युमर फूड प्राईस इन्डेक्स (Consumer Food Price Index-CFPI) यावर आधारित असतो. खाद्य पदार्थांचा महागाई दर हा गेल्या सात महिन्यातील सर्वात कमी आहे. या ऑगस्टमध्ये तो 3.1 टक्के इतका होता. त्याच्यामध्ये आता 0.68 टक्क्यांची घट झाली आहे. भाजीपाल्याच्या महागाई दरामध्ये मोठी घट झाली आहे. ती आता 22.5 टक्क्यांवर आहे. खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये 34.2 टक्के तर डाळी, अंडी आणि मांस यांच्या महागाईमध्ये 7 ते 8.75 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोअर इन्फ्लेशनचा दर हा 5.8 टक्क्यावर आहे. कोअर इन्फ्लेशनमध्ये खाद्य पदार्थ, इंधन दर यांचा समावेश नसतो. अर्थतज्ज्ञांच्या मते, येत्या काळात महागाई दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कारण महागाई दर हा उर्जा, धातू आणि लॉजिस्टिक कॉस्ट यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात औद्योगिक विकास दर हा 7.1 टक्के इतका होता. तो आता वाढला असून या ऑगस्टमध्ये तो 11.9 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था आता रुळावर येताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :