Gati Shakti Yojana: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'गति शक्ति' योजनेची सुरुवात, काय आहे ही योजना?
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आर्थिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची (Gati Shakti scheme) सुरुवात करणार आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आर्थिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची (Gati Shakti scheme) सुरुवात करणार आहेत. हा प्लान रेलवे, रस्त्यांसह अन्य 16 मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल मंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी संबोधित करताना या योजनेबाबत घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, गती शक्ति योजना लवकरच लॉन्च केली जाणार आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, असंही मोदी यांनी म्हटलं होतं.
गतिशक्ती योजनेत काय असणार?
प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं की, भारतात येणाऱ्या काळात गतिशक्ती योजनेसाठी एक राष्ट्रीय मास्टर प्लान देशासमोर ठेवला जाईल. 100 लाख कोटींपेक्षा अधिक किमतीची ही योजना असणार आहे. या योजनेच्या अंतर्गत लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. हा पूर्ण देशासाठी मास्टर प्लान असेल, जो प्लान देशात हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरचा पाया रचणार आहे. सध्या दळणवळणाच्या साधनांमध्ये ताळमेळ नाही, ही योजना यावर देखील काम करणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, या योजनेचा मुख्य उद्देश विविध प्रकल्पांना संपर्काच्या माध्यमातून मजबूती देण्याचा आणि एकीकृत करण्यासह समन्वय करण्याचा आहे. 16 मंत्रालयं आणि विभागांनी त्या सर्व प्रकल्पांना जीआयएस मोडमध्ये टाकलं आहे ज्या प्रकल्पांना 2024-25 पर्यंत पूर्ण करायचं आहे. ‘गति शक्ति' आपल्या देशासाठीचा एक मास्टर प्लान असणार आहे जो पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मदत करेल. सध्या आपल्या दळणवळण साधनांमध्ये समन्वय नाही, या योजनेमुळं अशा प्रकारच्या सर्व अडचणी दूर होतील.
हा मंच उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील महत्वाचा ठरणार आहे. भविष्यात आर्थिक क्षेत्रांच्या निर्मितीसाठी नवीन संधी विकसित करण्यास देखील याची मदत होणार आहे.
माहिती सूचना प्रसारण मंत्रालयानं भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ अनुप्रयोग आणि भू-सूचना विज्ञान संस्था यांनी हा मंच विकसित केला आहे.