एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशाचं पहिलं महिला SWAT पथक स्वातंत्र्यदिनाला मोदींच्या सुरक्षेत
विशेष म्हणजे ज्या महिलांचा SWAT पथकात समावेश झाला आहे त्या सर्व ईशान्य भारतातील आहेत.
नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस म्हणजेच SWAT कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 36 महिलांचं हे पथक स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर तैनात असेल. तसंच इंडिया गेटवरही महिलांचं SWAT पथक तैनात असेल.
सुमारे 15 महिन्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर या पथकाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचा SWAT पथकात समावेश झाला आहे त्या सर्व ईशान्य भारतातील आहेत. देशातील तसंच परदेशातील तज्ज्ञांनी या पथकाला प्रशिक्षण दिलं आहे. या महिला पथकाला बॉम्ब निकामी करणं, इमारतींवर चढणं आणि ओलिसांची सुटका करणं याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या पथकाने कालच (10 ऑगस्ट) आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
याआधी या पथकासाठी पुरुषांनाच प्राधान्य होतं. महिला SWAT पथक बनवण्याआधी 36 महिलांना 15 महिने कठोर प्रशिक्षण देण्यात आलं. अत्याधुनिक शस्त्र चालवायला शिकवलं. दहशतवाद्यांशी सामना करण्याच्या परिस्थितीबाबत सांगितलं. क्राव्ह मागा या टेक्निकमध्ये पूर्णत: तरबेज झाल्यानंतर त्यांना 'स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस' पथकात सामील करण्यात आलं. महिला कमांडोंचं हे पथक पुरुषांच्या सर्व पाच SWAT पथकांसोबत मिळून दिल्लीत काम करणार आहे.
"SWAT मधील पुरुषांचं वर्चस्व या महिलांनी मोडलं आहे. महिला हे काम करु शकत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण महिला पुरुषांच्या बरोबरीत आहे, हे सांगताना मला अभिमान वाटत आहे," असं दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुशवाहा म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement