(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus India Updates : देशात पुन्हा वाढला कोरोनाचा प्रादुर्भाव; 24 तासांत 22 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद
India Coronavirus Updates : देशात काल (बुधवारी) 24 हजार 602 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 44 हजार 198 वर पोहोचली आहे.
India Coronavirus Updates : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 431 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही.
आतापर्यंत 4 लाख 49 हजार 856 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल 24 हजार 602 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 44 हजार 198 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 38 लाख 94 हजार 312 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत चार लाख 49 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात काल (बुधवारी) 2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 90 रुग्णांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवारी) 2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 67 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे.
राज्यात काल (बुधवारी) 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 929 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (37), परभणी (87), हिंगोली (16), नांदेड (09), अकोला (22), वाशिम (07), बुलढाणा (01), नागपूर (97), यवतमाळ (05), वर्धा (6), भंडारा (1), गोंदिया (1), गडचिरोली (33 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 33 हजार 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,39,760 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,416 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 96,19, 637 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 540 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,636 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4519 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1131 दिवसांवर गेला आहे.