(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Covid 19 Cases Updates : कोरोनाचा हाहाकार! केवळ 7 दिवसांत 10 लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद; हजारोंनी गमावले प्राण
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 84 हजार 372 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 72 हजार 85 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. देशात दररोज दीड लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे. असचं सुरु राहिलं तर हा आकडा दोन लाखांच्या पार जाऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढतच चालला आहे. अशातच देशात गेल्या 7 दिवसांत 10 लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. चिंतेची बाब म्हणजे, नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यासोबतच देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांत 5908 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत.
गेल्या 7 दिवसांचा कोरोना चार्ट
13 एप्रिल : 184372 रुग्ण, 1027 मृत्यू
12 एप्रिल : 161736 रुग्ण, 879 मृत्यू
11 एप्रिल : 168912 रुग्ण, 904 मृत्यू
10 एप्रिल : 152879 रुग्ण, 839 मृत्यू
9 एप्रिल : 145384 रुग्ण, 794 मृत्यू
8 एप्रिल : 131968 रुग्ण, 780 मृत्यू
7 एप्रिल : 126789 रुग्ण, 685 मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 84 हजार 372 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 72 हजार 85 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आजच्या दिवसापर्यंत देशातील कोरोनाची स्थिती :
एकूण रुग्णसंख्या : 1 कोटी 38 लाख 73 हजार 825
कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण : 1 कोटी 23 लख 36 हजार
सध्याचे सक्रिय रुग्ण : 13 लाख 65 हजार 704
एकूण मृत्यू : 1 लाख 72 हजार 85
एकूण देण्यात आलेल्या लसी : 1 कोटी 11 लाख 79 हजार 578
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता देशभरात विविध राज्यांमध्ये कमी- जास्त स्वरुपात निर्बंध लागू करत लॉकडाऊनसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात याच धर्तीवर पुढली 15 दिवस संचारसबंदीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मंगळवारी राज्यातील जनतेला संबोधित करत असताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढील 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- India Corona Cases Updates: पुन्हा मोडला कोविड रुग्णसंख्या वाढीचा विक्रम; 24 तासांत 1 हजारहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू
- Maharashtra Partial Lockdown : आता 50 नव्हे, 25 जणांच्या उपस्थितीतच उरकावं लागणार 'शुभमंगल', नवे निर्बंध जारी
- Break The Chain : राज्यात आज रात्री 8 पासून कलम 144 लागू; काय सुरु, काय बंद?
- CM Uddhav Thackeray Speech | राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू, पुढचे 15 दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री
- Maharashtra Corona Curfew: कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे