(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Corona Cases Today : कोरोना प्रादुर्भावात काहीसा दिलासा; देशात गेल्या 24 तासांत 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
India Corona Cases Today : गेल्या 24 तासांत देशात 343,144 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,44,776 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
India Corona Cases Today : देशात काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, संकट अद्याप टळलेलं नाही. कोरोना महामारीमुळे दरदिवशी जवळपास चार लोकांचा मत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 343,144 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,44,776 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 362,727 नव्या बाधितांची नोंद झाली होती.
13 मेपर्यंत देशभरात 17 कोटी 92 लाख 98 हजार 584 कोरोना लसीचे डोस देण्यात आले होते. काल दिवसभरात 20 लाख 27 हजार 162 लसीचे डोस दिले गेले आहेत. तसेच आतापर्यंत 31.13 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 18.75 लाख कोरोना सॅम्पल्स तपासण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्ह रेट 18 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 40 लाख 46 हजार 809
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 79 हजार 599
एकूण सक्रिय रुग्ण : 37 लाख 04 हजार 893
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 62 हजार 317
देशातील एकूण लसीकरण : 17 कोटी 92 लाख 98 हजार 584
देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट 83 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 16 टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
गुरुवारी राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी कमी होत असून तुलनेनं डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त येत आहे. काल (गुरुवार) राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 4654731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.34% एवढे झाले आहे.
राज्यात काल 850 कोरोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 30351356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5269292 (17.36टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3502630 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण 533294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत गुरुवारी पुन्हा घट झाली आहे. मुंबईत काल 1,946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,037 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 68 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 38 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 2116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 4293 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 189 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर गेले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :