India Coronavirus Update: देशात गेल्या 24 तासात 40 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण, एकट्या केरळमध्ये 20 हजार रुग्ण
India Coronavirus Updates: भारतात कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा रोजचा आकडा 40 हजारांच्या जवळपासच येत आहे.
India Coronavirus Updates: भारतात कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा रोजचा आकडा 40 हजारांच्या जवळपासच येत आहे. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात देशात 38,667 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 478 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. कालच्या तुलनेत आज कमी केसेस समोर आल्या आहेत. काल 40,120 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात देशात 35,743 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर आतापर्यंत देशात तीन कोटी 21 लाख 56 हजार जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी 4 लाख 30 हजार 732 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 38 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 87 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना एकूण रुग्ण- तीन कोटी 21 लाख 56 हजार 493
एकूण डिस्चार्ज- तीन कोटी 13 लाख 38 हजार 88
एकूण एक्टिव्ह केस- तीन लाख 87 हजार 673
एकूण मृत्यू - चार लाख 30 हजार 732
एकूण लसीकरण- 53 कोटी 61 लाख 89 हजार डोस
केरळमध्ये शुक्रवारी देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद
केरळमध्ये शुक्रवारी देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. काल तिथं 20,452 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 114 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये आतापर्यंत 36 लाख 52 हजार 90 रुग्णांची नोंद झाली आहे तर 18,394 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 16,856 जण केरळमध्ये कोरोनामुक्त झाले.
महाराष्ट्रात काल 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 6,686 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85टक्के आहे. महाराष्ट्रात काल 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (1), परभणी (40), हिंगोली (81), नांदेड (51), अमरावती (57), अकोला (37), वाशिम (21), बुलढाणा (6), यवतमाळ (16), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83), गडचिरोली (25) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.