एक्स्प्लोर

एलएसीवर चीनसोबतच भारतीय सैनिकांचा कोरोनाशीही लढा

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य सीमेवर खडा पहारा देत आहेत. मात्र त्याच वेळी चीनमधूनच जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरससोबतही सैनिकांचा लढा सुरु आहे. भारतीय सैन्यात आतापर्यंत 16 हजार 758 सैनिकांना कोरोनाची लागण झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

लडाख : एलएसीवर चीनचा सामना करण्यासोबतच भारतीय‌ सैन्य कोरोनाशीही लढत आहे. कारण देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात सैनिक पूर्व लडाखमध्ये पोहोचत आहेत. मात्र भारतीय सैन्य कोरोनाबाबात पूर्णत: सतर्क आहे. कोरोनाविरुद्ध भारतीय सैन्याची तयारी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजची टीम मिलिट्री ट्रान्झिशन फॅसिलिटी इथे पोहोचली, जिथे मोठ्या प्रमाणात सैनिक दाखल होत आहेत. भारतीय सैन्यामध्ये जवळपास 17 हजार कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 32 सैनिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

एबीपी न्यूजची टीम पूर्व लडाखच्या एका फॉरवर्ड एअरबेसवर पोहोचली असता तिथे हवाईदलाच्या सी-17 ग्लोबमास्टर आणि आयएल76 यांसारख्या मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून मोठ्या संख्येने सैनिक पोहोचले होते. विमानातून उतरणाऱ्या सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. एअरक्राफ्टमधून उतरल्यानंतर सैनिक एका रांगेत उभे राहिले, ते ही सोशल डिस्टन्सिंगंची काळजी घेऊनच. सगळ्यांची हजेरी घेऊन आणि दस्तऐवज तपासल्यानंतर जवळच बनवलेल्या मिलिट्री ट्रान्झिशन फॅसिलिटी‌ (एमटीएफ) पाठवलं.

सिव्हिल एअरपोर्टच्या टर्मिनलप्रमाणेच एमटीएफ म्हणजेच मिलिट्री ट्रान्झिशन फॅसिलिटी हे एअरबेसचं टर्मिनल असतं. इथे सगळ्या सैनिकांना सर्वात आधी एका रांगेत बसवलं जातं, मग प्रत्येकाची कोरोनाच्या प्राथमिक तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग केली जाते. थर्मल स्क्रीनिंगनंतरच सैनिकांना लेहमधील ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवलं जातं. एमटीएफ टर्मिनलवर ठिकठिकाणी कोरोनापासून बचावासाठी पोस्टर लावण्यात आले आहेत. सैनिकांचं सामान एमटीएफवर पोहोचल्यावर सॅनिटाईज करुनच पुढे पाठवलं जातं.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखच्या प्रत्येक युनिट आणि छावणीत कोरोनाबाबत कठोर प्रोटोकॉल आहेत. छावणीच्या बाहेरच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पुन्हा एकदा त्यांची थर्मल स्क्रीनिंग करतात, मगच त्यांना फॉरवर्ड लोकेशनवर पाठवलं जातं.

जानकारी के मुताबिक, मात्र फॉरवर्ड लोकेशनवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अतिशय कठीण होतं. परंतु कोणालाही कोरोनाची लक्षणं असतील तर तातडीने याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा एएससी म्हणजेच आर्मी मेडिकल कोअरला द्यावी, असे स्पष्ट निर्देश सर्व सैनिकांना देण्यात आले आहेत.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी कालच (16 सप्टेंबर) एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात लोकसभेत सांगितलं होतं की आतापर्यंत भारतीय सैन्यातील 16 हजार 758 सैनिकांना कोरोनाची लागण झाली असून 32 सैनिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हवाई दलाचे 1 हजार 356 एअरमनलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर नौदलातील हा आकडा 1 हजार 716 आहे. हवाई दलात आतापर्यंत 3 एअरमनचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सुदैवाना नौदलात कोरोनामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Embed widget