(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जावई माझा लाडाचा...मकरसंक्रातीच्या शाही जेवणात 365 पदार्थांची आरास
मकर संक्रातीसाठी (Makar Sankrant) आंध्र प्रदेशातील कुंटुंबाने होणाऱ्या जावयासाठी खास शाही जेवणाचे आयोजन केले होते. यासाठी तब्बल 365 पदार्थ बनवले होते.
मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये जावयाला खूपच महत्वपूर्ण स्थान मिळाले आहे. जावई घरी आल्यानंतर त्याची चांगली खातिरदारी केली जाते आणि जावयाच्या सोईमध्ये कोणतीही कमी पडू नये हा प्रयत्न केला जातो. विशेषतः नवविवाहित तरुणांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूंची अधिक रेलचेल असते. देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा आहे. आता होणाऱ्या लाडक्या जावयासाठी आंध्रप्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यात अशीच एक परंपरेचे पालन केले जाते. होणाऱ्या लाडक्या जावयसाठी नरसापुरमच्या एका कुटुंबाने मकर संक्रातीच्या सणासाठी एक, दोन नव्हे तर तब्बल 365 पदार्थ बनवले आहे.
मकर संक्रातीसाठी आंध्र प्रदेशातील कुंटुंबाने जावयासाठी खास शाही जेवणाचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल 365 पदार्थ बनवले होते. परिवारातील एका सदस्याने सांगितले की, जावयासाठी असणारे आमचे प्रेम हे एक दिवसासाठी नाही तर वर्षातील 365 दिवस आहे. त्यामुळे आम्ही वर्षाचे 365 दिवस समोर ठेवून 365 पदार्थ बनवले आहेत. मकर संक्रातीनंतर या तरुणाचा विवाह होणार आहे
मिळालेल्या माहितीनुसार तुम्मलपल्ली सुब्रह्मण्यम आणि अन्नपूर्णा यांचा मुलगा साईकृष्णचा विवाह सोन्याचे व्यापारी वेंकटेश्वर राव आणि माधवी यांची कुंदवीशी होणार आहे. परंतु संक्रातीच्या सणासाठी लग्नाअगोदर मुलीचे आजोबा अचंता गोविंद आणि आजी नागमणी यांनी वरासाठी एका शाही भोजनाची व्यवस्था केली. या भव्य प्री- वेडिंग सेलिब्रेशनसाठी वर आणि वधू दोघांच्या परिवार सहभागी झाले होते.
शाही भोजनासाठी काय पदार्थ होते?
या भव्य अशा शाही भोदनासाठी 30 प्रकराच्या भाज्या, भात, पारंपारिक गोदावरी मिठाई, बिर्याणी, थंड पेय, बिस्किट, केक होते. या संपूर्ण शाही भोजनाची चर्चा पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यात झाली आहे. गोदावरीतील हे दोन्ही जिल्हे आपल्या अतिथ्यासाठी ओळखले जातात.
महत्त्वाच्या बातम्या:
- महागडी खतं घेणं शेतकऱ्यांना परवडणारं नाही, खतांच्या किंमती पूर्ववत करा, राज्याचं केंद्राला पत्र
- Rythu Bandhu Scheme : तेलंगणात रायथू बंधू योजनेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात, 64 लाख जणांच्या खात्यावर 50 हजार कोटींची रक्कम
-
संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक, 31 जानेवारीला सरकारविरोधात 'विश्वासघात दिवस' साजरा करणार