Nuclear Power Plant On The Moon : चीन जमिनीवर नाही, पण थेट चंद्रावर भारताला साथ देण्यास एका पायावर तयार, रशिया सुद्धा मदतीला धावणार!
Nuclear Power Plant On The Moon : रशियातील व्लादिवोस्तोक येथे आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये लिखाचेव्ह म्हणाले की, भारत आणि चीन या प्रकल्पात सामील होण्यासाठी खूप स्वारस्य दाखवत आहेत.
Nuclear Power Plant On The Moon : भारतासोबत चीनच्या जमिनीवर कुरघोड्या सुरु असल्या, तरी थेट चंद्रावर साथ देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने टासने म्हटले आहे की, रशियासह भारत आणि चीन चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहेत. टासच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमचे प्रमुख अलेक्सी लिखाचेव्ह यांनी याबद्दल सांगितले आहे.
भारत आणि चीन सामील होण्यासाठी खूप स्वारस्य दाखवत आहेत
रशियातील व्लादिवोस्तोक येथे आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये लिखाचेव्ह म्हणाले की, भारत आणि चीन या प्रकल्पात सामील होण्यासाठी (Nuclear Power Plant On The Moon) खूप स्वारस्य दाखवत आहेत. "आमच्या चिनी आणि भारतीय भागीदारांना आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहभागासह यामध्ये खूप रस आहे," ते म्हणाले. भारताला 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवायचा आहे आणि तिथे आपला तळ तयार करायचा आहे. अशा स्थितीत या प्रकल्पात भारताचे हित महत्त्वाचे ठरते.
भारतालाही चंद्रावर आपला तळ तयार करायचा आहे
रोसाटॉमच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणाऱ्या या वीज प्रकल्पातून अर्धा मेगावॅट वीजनिर्मिती होणार असल्याचे टासने म्हटले आहे. ही वीज चंद्रावर उभारण्यात येणाऱ्या पायासाठी वापरली जाणार आहे. लिखाचेव्ह म्हणाले की, चीन आणि भारत या अभूतपूर्व प्रकल्पात सामील होण्यास उत्सुक आहेत. रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉसने मे महिन्यातच या प्रकल्पावर काम सुरू करण्याची घोषणा केली होती. ही अणुभट्टी चंद्रावर उभारल्या जाणाऱ्या तळाला ऊर्जा देईल, ज्यावर रशिया आणि चीन एकत्र काम करत आहेत. भारतालाही चंद्रावर आपला तळ तयार करायचा आहे आणि त्यामुळे तोही या प्रकल्पात सहभागी होऊ शकतो.
चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणे अवघड काम असेल
चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणे अवघड काम असेल. हे काम मानवाच्या मदतीशिवाय स्वत:हून काम करणाऱ्या रोबोटच्या मदतीने केले जाईल, असे रशियाने आधीच सांगितले आहे. रशिया आणि चीनने 2021 मध्ये चंद्रावर संयुक्त तळ बांधण्याची घोषणा केली होती, ज्याला आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र (ILRS) म्हटले जाईल. 2035 ते 2045 दरम्यान ते टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केले जाईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारत अमेरिका आणि रशियाशी आपले राजनैतिक पत्ते काळजीपूर्वक टाकत आहे. भारत गगनयान मोहिमेतील शुभांशु शुक्ला यांना अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवत आहे, तर दुसरीकडे रशियाच्या चंद्र ऊर्जा प्रकल्पात चीनसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे.