एक्स्प्लोर

"गावात 2 कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचं माझं स्वप्न"; PM मोदींची लाल किल्ल्यावरुन ड्रोन योजनेची घोषणा

Independence Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. मोदींनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबद्दलही अनेक वक्तव्य केली. महिला सेल्फ ग्रुपच्या महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेबद्दल सांगितलं.

PM Modi Will Make 2 Crore Lakhpati Didi Girls in Villages: स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक नवीन योजनांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीबद्दल बोलले. त्याचबरोबर काही नव्या योजनांचीही मोदींनी घोषणा केली. यामध्ये शेतीला हायटेक करण्यापासून महिलांना पुढे नेण्यापर्यंतचा समावेश आहे. यावर्षी पंतप्रधान मोदींनी दोन कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याची घोषणा केली आहे.

पीएम मोदी म्हणाले की, "बँकांपासून ते अंगणवाड्यांपर्यंत असं एकही व्यासपीठ नाही की, ज्यामध्ये महिला योगदान देत नसतील. आता माझं स्वप्न गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचं आहे. त्यासाठी आम्ही एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे." ज्यामध्ये 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचं आणि दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. यामुळे ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण होईल आणि देशाचं कृषी तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत होईल."

या योजनेंतर्गत पीएम मोदींनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्याबाबत बोललं आणि महिला सेल्फ ग्रुपच्या महिलांना ड्रोन चालविण्याचं प्रशिक्षण देण्याच्या योजनेबद्दल सांगितलं. शेतीच्या कामात ड्रोनची सेवा सुरू करण्याबाबत त्यांनी सांगितलं, जेणेकरून शेतकरी आणि कृषी समाज पुढे जाऊ शकेल.

पाहा व्हिडीओ : Independent Day Pm Modi Speech : भारतातील महिला जगात पुढे, 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं स्वप्न

यासोबतच पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माता, भगिनी आणि मुलींना मी सांगू इच्छितो की, माझ्या माता-भगिनींच्या बळावर आज देशाची प्रगती झाली आहे. आज देश प्रगतीच्या मार्गावर आहे, त्यामुळे हे सर्वांचेच प्रयत्न आहेत. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो." होय, तुमच्या मेहनतीमुळेच आज देश कृषी क्षेत्रात प्रगती करत आहे."

शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या या योजनेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच लाख कोटी रुपये जमा केले आहेत. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचावं यासाठी आम्ही जल जीवन मिशनवर 2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. आम्ही आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 70 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना औषधं मिळावीत, त्यांना चांगले उपचार मिळावेत. यासाठी आम्ही सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. पशुधन वाचवण्यासाठी जवळपास 15 हजार कोटी रुपये लसीकरण योजनेसाठी दिले."

यासोबतच पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हा एक नवा भारत आहे. आत्मविश्वासानं भरलेला भारत, एक भारत जो आपले संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. म्हणूनच हा भारत.. थांबत नाही, थकत नाही, दमत नाही आणि हा भारत कधीच हरत नाही."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींकडून 'विश्वकर्मा योजने'ची घोषणा; कधी सुरू होणार, कोणाला होणार फायदा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget