एक्स्प्लोर

जनधन खात्यात जमा झालेल्या बेहिशेबी 1.64 कोटी रुपयांचा छडा

नवी दिल्ली : गरीबांच्या जनधन खात्यात पैसे टाकून काळ्याचे पांढरे करण्याचा मार्ग काही लोकांनी शोधला असला तरी आयकर विभागाने आता त्याविरोधात मोहीम उघडलीय. आयकर विभागाने केलेल्या तपासात तब्बल 1.64 कोटी रूपयांच्या बेहिशेबी रक्कमेचा छडा लागला आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधून जनधन खात्यामध्ये सर्वाधिक बेहिशेबी रकमा जमा झाल्या होत्या. एरवी शून्य शिल्लक असलेल्या या खात्यांमध्ये कोट्यवधींच्या रकमा झाल्या होत्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता, मिदनापूर केरळमधील कोची आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांमध्ये तब्बल 1.64 कोटी रूपयांची रोकड जमा करण्यात आली होती. तर बिहारमधील आरामध्ये एका जनधन खात्यात तब्बल 40 लाख रूपये जमा करण्यात आले होते. आपलं उत्पन्न करपात्र नसल्यामुळे जे लोक कधीच इनकम टॅक्स रिटर्न फाईल करत नाहीत, अशाच व्यक्तींच्या जनधन खात्यातून या रकमा जमा करण्यात आल्या आहेत. सीबीडीटी म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सर्वसामान्य जनधन खातेधारकांना आपल्या खात्याचा दुरूपयोग न करण्याचं तसंच काळे पैसे साठवलेल्यांना जनधन खात्याचा गैरवापर करण्याची मुभा देऊ नका, असं आवाहन केलंय. अलीकडेच उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खातेधारकांना त्यांच्या खात्यात काही श्रीमंताकडून जमा केलेले पैसे काढू नका, असं आवाहन केलं होतं. हे सर्व पैसे आता गरीब जनधन खातेधारकाचेच होतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. तुमच्या खात्यात हे पैसे कुणी जमा केले, याचा छडा आयकर विभाग लावणार असल्याचंही त्यांनी प्रचार सभेत सांगितलं होतं. जे धनदांडगे त्यांची बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी किंवा पांढरी करून घेण्यासाठी या जनधन खात्याचा वापर करत आहेत, त्यांना गजाआड करणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. देशभरात सध्या 25 कोटींपेक्षा जास्त जनधन बँक खाती देशभरातील 25.78 कोटी जनधन खात्यांपैकी तब्बल 19.88 कोटी जनधन खाती ही कार्यरत असून 5.9 कोटी खाती आजही शून्य शिलक्कीची आहेत. म्हणजे या खात्यांमध्ये कसलाही व्यवहार झालेला नाही. 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेकांनी आपला काळा पैसा या जनधन खात्यात जमा केला. नऊ नोव्हेंबरनंतर सर्वाधिक वेगाने जनधन खात्यात पैसे जमा होण्यात पश्चिम बंगालचा पहिला क्रमांक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget