CBSE बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार, राज्यांना 25 मेपर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन
बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसोबत सुरू असलेली बैठक संपली आहे. राज्यांना 25 मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
![CBSE बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार, राज्यांना 25 मेपर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन In the meeting of Education Ministers the decision was taken regarding the 12th examination CBSE बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार, राज्यांना 25 मेपर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/23/21170be668aed740bcdc5dcd09a73be6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार आहे. राज्यांना 25 मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतर केंद्र सरकार याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल यांनी दिलीय. बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसोबत सुरू असलेली बैठक संपली आहे.
दरम्यान, दिल्ली वगळता सर्व राज्ये बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ही परीक्षा होम सेंटरवरच घेण्यात येणार आहे. पासवर्ड प्रोटेक्टेड ई-पेपर केंद्रावर पाठविला जाणार आहे. बैठकीत सीबीएसईने सांगितले की ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेऊ शकतात. बैठकीनंतर लवकरच ही तारीख जाहीर केली जाईल असा विश्वास आहे.
बारावीच्या परीक्षेबाबतच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली होती. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त बैठकीत परीक्षेसंदर्भात अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीत शिक्षणमंत्री, सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण सचिव उपस्थित होते.
आधी लस मग परीक्षा : मनीष सिसोदिया
दुसरीकडे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला सांगितले की, विद्यार्थ्यांना लसी देण्यापूर्वी बारावीच्या बोर्ड परीक्षा घेणे ही मोठी चूक असेल. ते म्हणाले की, बारावीच्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याबाबत केंद्राने फायझरशी बोलावे.
मनीष सिसोदिया म्हणाले की, इयत्ता 12 वीतील 95 टक्के विद्यार्थी 17.5 वर्षांच्या वयापेक्षा जास्त आहेत. ते म्हणाले की विद्यार्थ्यांना कोविशिल्ड, कोवॅक्सिन लस दिली जाऊ शकते का याविषयी केंद्राने तज्ञांशी चर्चा केली पाहिजे.
कोरोनामुळे अनेक परीक्षा स्थगित
कोरोना संक्रमणामुळे सर्व राज्य शिक्षण मंडळे, सीबीएसई, आयसीएसई यांनी 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासह एनटीएसह राष्ट्रीय परीक्षा घेतलेल्या इतर संस्थांनीही या परीक्षा स्थगित केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)