एक्स्प्लोर

Amit Shah on Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं वक्तव्य

Amit Shah on Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांचीचौकशी करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं म्हटलं आहे.

Amit Shah on Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात (Shraddha Murder Case) महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. याच संदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असंही अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी हे वक्तव्य केलं आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं की, "श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. माझं संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केलं असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल." 

श्रद्धाने पोलिसांकडे चिठ्ठीतून केली होती आफताबच्या धमकीची तक्रार

श्रद्धा वालकर प्रकरणाचा तपास दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, "जे पत्र समोर आलं आहे. त्यात दिल्ली पोलिसांची कोणतीही भूमिका नव्हती. श्रद्धानं महाराष्ट्रातील एका पोलीस स्थानकात पत्र पाठवून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन तिला जीवेमारण्याची धमकी आफताबकडून दिली जात असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळी कोणतीही कारवाई झालेली नाही. याच गोष्टीची चौकशी केली जाईल. त्यावेळी आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे त्यावेळी जे कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल." 

पाहा व्हिडीओ : श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार

आफताबनं श्रद्धाच्या शरीराचे केले 35 तुकडे 

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कॉल सेंटरची कर्मचारी श्रद्धा वालकर हिने लिहिलेल्या पत्रावर कारवाई करण्यात महाराष्ट्र पोलिसांच्या कथित अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला यानं आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं श्रद्धा वालकरनं पत्रात लिहिलं होतं. आफताबनं लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे.

आफताबनं श्रद्धाच्या शरीराचे हे तुकडे दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्यांच्या घरी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. मध्यरात्री शहरातील विविध भागांत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकण्यासाठी तो अनेक दिवस फिरत होता. त्याला दिल्ली पोलिसांनी 19 नोव्हेंबरला अटक केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shraddha Murder Case : आफताबने सिगारेटचे चटके दिले होते, तरीही श्रद्धाने त्याला दिली होती एक संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget