Coronavirus | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय, आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स 22 मार्चपासून बंद
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वृद्ध नागरिकांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या विशेष सवलती काढून घेतल्या आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वृद्ध नागरिकांचा प्रवास कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या विशेष सवलती काढून घेतल्या आहेत. अनावश्यक प्रवास करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. येत्या 20 मार्चपासून ही सवलत रद्द करण्यात येत आहे. याशिवाय 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही बंद करण्यात येणार आहेत. पुढील एका आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
जगभरात दोन लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 9 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात 175 पेक्षा अधिक लोकांना लागण झाली आहे, तर चार जणांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22 मार्चपासून आठवडाभर ही सेवा बंद करण्यात येणार आहे.
भारतात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची माहिती घेतली तर जास्तीत जास्त जण परदेशातून परतले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा सरकारने दिली आहे. तर उरलेल्या 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर यावं लागणार आहे. हे कर्मचारी तीन वेगवेगळ्या वेळांमध्ये कामाला येतील, त्यामुळे गर्दी कमी होईल. सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत, सकाळी 9.30 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत अशा वेळा ठरवण्यात आल्या आहेत. कार्यालयाजवळ राहणाऱ्या आणि स्वत:चे वाहन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
PM Narendra Modi | Janata Curfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदी यांची घोषणा
संबंधित बातम्या
- Coronavirus | क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार : अनिल देशमुख
- Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर : राजेश टोपे
- Coronavirus | घाबरुन कोणतंही युद्ध जिंकता येत नाही, महाराष्ट्र नक्की जिंकणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 175, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंद
- Coronavirus : क्वारंटाईनचा शिक्का असूनही चौघा संशयितांचा रेल्वेतून प्रवास