एक्स्प्लोर

नोटाबंदीने व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे देशातील रोकड शोषली : आयएमएफ

नवी दिल्ली : देशात नोटाबंदीचा निर्णय होऊन आता चार महिने पूर्ण झाले आहेत. पण या निर्णयाने सर्वसामान्यांवर झालेल्या परिणामांची अजूनही चर्चा सुरु आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रोकिंग कंपन्या आणि रेटिंग एजन्सींनीही याचा वाईट परिणाम झाल्याचं मान्य केलं आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने यापूर्वीच नोटाबंदीने देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली होती. पण आता याचसंदर्भात आणखी एक वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. आयएमएफच्या एका अधिकाऱ्याने नोटाबंदीने देशात रोख रकमेची मोठी समस्या निर्माण झाली असून, याने सामान्य ग्राहक मोठ्याप्रमाणात प्रभावित झाल्याचं म्हणलं आहे. तसेच या निर्णयाने देशातील रोकड व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे शोषली आहे. शिवाय यानंतर रोकड पोहचवण्यचं काम धिम्या गतीने सुरु असून, चलनटंचाईची समस्या मिटवली जात असल्याचं सांगितलं आहे. आयएमएफचे अशिया विभागाचे सहाय्यक संचालक पॉल ए कॅशीन यांनी सांगितले की,  ''तुम्ही अपारंपरिक पद्धतीने मुद्रा नीतिंचा वापर करुन हेलिकॉप्टरने पैसे पाठवण्याबाबत ऐकले असेल. अशाच प्रकारे नोटाबंदीच्या निर्णयाला व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे घेतलं जाऊ शकतं,'' असं म्हणत नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडवली. दरम्यान, आयएमएफने भारतासंदर्भातील आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला असून, कॅशीन यांना याबाबत विचारले असता, त्यांनी हा निर्णय म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरने रोकड शोषण्यासारखा असल्याचं म्हणलं. तसेच यानंतर व्हॅक्यूम क्लीनर उलटा फिरवून पैसा वाटला जात आहे. पण याची गती अतिशय धिमी आहे. याने देशात चलनटंचाई निर्माण झाली आहे. ज्याने देशातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. असंही सांगितलं. तर दुसरीकडे बाजरपेठेतील चलन तुटवड्यावरुन आयएमएफने आपल्या अहवालातून केंद्र सरकारला बँकेत नव्या नोटा उपलब्ध करुन देण्याचे काम जलद गतीने करावे, अशा कानपिचक्याही दिल्या आहेत. तसेच दुर्गम भागासाठी जुन्या नोटा वापरण्यासंदर्भातील सूट द्यावी अशाही सुचना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget