एक्स्प्लोर

IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ पंतप्रधानांना भेटल्या, भेटीत नेमकी काय चर्चा झाली? 

IMF Chief Gita Gopinath Called On PM Modi:  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ  (Chief Economist) गीता गोपीनाथ यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

IMF Chief Gita Gopinath Called On PM Modi:  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ  (Chief Economist) गीता गोपीनाथ यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयानं (PMO) एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत मात्र काही माहिती दिलेली नाही. PMOनं म्हटलं आहे की,  "आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ  गीता गोपीनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

49 वर्षीय भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी जानेवारी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. 'आयएमएफ' (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आलं आहे.  मागील काही दिवसांपूर्वी पिछले दिनों आयएमएफनं सांगितलं होतं की, गीता गोपीनाथ येत्या जानेवारीत आपली नोकरी सोडून हार्वर्ड यूनिवर्सिटी (Harvard University)मध्ये परतणार आहेत. 

गीता गोपीनाथ यांनी भारतातील कृषी क्षेत्रात मोठ्या सुधारणांची गरज असल्याचं सांगत रद्द केलेल्या केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं होतं. पण हे समर्थन करताना त्यांनी शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षेची पूर्ण हमी देण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केलं होतं.

गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. त्या आधी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात अध्ययनाचं काम केलं आहे. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या गीता गोपीनाथ या सध्या अमेरिकन नागरिक आहेत. गीता गोपीनाथ यांनी आपली पदवी दिल्ली विद्यापीठातून प्राप्त केली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक्स आणि यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथून केलं. गीता गोपीनाथ यांचा जन्म म्हैसूरमध्ये झाला होता.  गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्‍ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचं म्हटलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ

IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञांकडून नव्या कृषी कायद्यांचंं समर्थन, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याचाही विश्वास

सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरे, शहरी गरीबांना रोख रक्कम देणे आवश्यक, IMF चीफ इकोनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांचा सल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget