Weather Update : दिल्लीत हलक्या पावसाच्या सरी, तर उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज उत्तराखंडमध्ये पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) सुरूच आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज राजधानी दिल्लीत काहीसा तुरळक पाऊस असेल. येथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट
उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये पावसामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट जारी केला आहे. डेहराडूनमध्ये 12 ते 14 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसामुळे रस्त्यांची आणि पुलांचीही मोठी दुरावस्था झाली आहे.
— RWFC New Delhi (@RWFC_ND) August 11, 2023
राजस्थानमध्ये 15 ऑगस्टनंतर पावसाची हजेरी
राजस्थानमध्ये 15 ऑगस्टनंतरच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्यप्रदेशात येत्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र, या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या रिमझिम सरी पडू शकतात. 15 ऑगस्टनंतरच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 15 ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये रविवारी पाऊस पडू शकतो. तर, पश्चिम उत्तर प्रदेशात रविवारी आणि 14 ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटले आहे की पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार आणि जम्मूमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडीने असेही म्हटले आहे की, पुढील सात दिवसांत उर्वरित वायव्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात रविवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम सारख्या भागांत पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी पश्चिम बंगालमध्ये आणि झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.
अतिवृष्टीबाबत इशारा
बिहारमधील 9 जिल्ह्यांमध्ये आज (12 ऑगस्ट) अतिवृष्टीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. झारखंडमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही.
कोणत्या राज्यात पाऊस पडणार?
याशिवाय गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :