एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुलगी प्रौढ, कमवती असेल तर पालन-पोषणासाठी वडिलांच्या पैशावर हक्क सांगता येणार नाही, न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुलगी प्रौढ, कमवती असेल तर पालन-पोषणासाठी वडिलांच्या पैशावर हक्क सांगता येणार नाही, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. हरियाणातील यमुनानगरच्या न्यायालयानं दिलेला हा निर्णय अनेक बाजूंनी महत्त्वपूर्ण आहे.

यमुनानगर : जर मुलगी प्रौढ, सुशिक्षित, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर तिला वडिलांकडून स्वखर्चासाठी पैशांची मागणी करण्याचा अधिकार नाही असा महत्वपूर्ण निकाल एडीजे कोर्टानं (अॅडिशनल डिस्ट्रिक्ट जज) दिला आहे.सीजेएम कोर्टाने (चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट) त्या आधी दिलेला निर्णय एडीजे कोर्टानं रद्दबदल ठरवला आहे. कोर्टानं एका वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला. 2018 मध्ये सीजेएम कोर्टानं एका याचिकेवर निकाल देताना वडिलांनी मुलीला स्वतःच्या खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देत वडिलांनी एडीजे कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेत वडिलांनी मुलगी त्यांच्यासोबत राहत नसून ती वेगळी राहत असल्याचं नमूद केलं होतं. 

हरियाणातील यमुनानगरमध्ये सीजेएम कोर्टाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी एडीजे कोर्टात याचिका दाखल केली होती. एडीजे नेहा नौहरिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सीजेएमनं कलम 125 अंतर्गत मुलीला स्वखर्चासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. एडिजे कोर्टानं कलम 125 अंतर्गत प्रौढ, सुशिक्षित, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर तिला वडिलांकडून स्वखर्चासाठी पैशांची मागणी करण्याचा अधिकार नाही, असा निकाल दिला आहे. अशातच यमुनानगरच्या न्यायालयानं दिलेला हा निर्णय अनेक बाजूंनी महत्त्वपूर्ण आहे. 

दरम्यान, रेल्वेमधून निवृत्त झालेले रमेश चंद्र यांचे आपल्या पत्नीसोबत गेल्या बऱ्याच काळापासून वाद सुरु आहेत. पत्नी आणि त्यांची मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नाहीत. यापूर्वीच त्यांच्या पत्नीला तिच्या खर्चासाठी दरमहा एक हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. तसेच मुलीलाही दरमहा खर्चासाठी 3 हजार रुपये देण्यात येत होते. अशातच रमेश चंद्र यांचे वकिल संदीप शर्मा यांनी कोर्टात सांगितलं की, मुलगी प्रौढ आहे. तसेच ती शिक्षित आहे. त्यामुळे तिला वडिलांकडून खर्चासाठी पैसे मागण्याची अजिबात गरज नाही. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितलं होतं की, वडिल 70 वर्षांचे आहेत, ते आधीच आपल्या पत्नीला दरमहा खर्चासाठी पैसे पुरवत आहेत. त्यामुळे कोर्टानं दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. जर मुलगी लहान असती आणि आपला उदर्निर्वाह करण्यासाठी असमर्थ असती, तर अशा परिस्थितीत वडिलांनी पैसे देणं योग्य ठरलं असतं, पण या प्रकरणात मुलगी प्रौढ असून स्वतःचा उदर्निर्वाह करण्यास समर्थ आहे. 

अशातच रमेश चंद्र यांच्या मुलीचे वकिल विनोद राजोरिया यांचं म्हणणं आहे की, एका अविवाहित तरुणीनं आपल्या वडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही युवती प्रौढ आहे. त्यामुळे ती आपल्या वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागू शकते. परंतु, कोर्टानं म्हटलं आहे की, मुलगी प्रौढ आहे, तसेच स्वतःचा उदर्निर्वाह करण्यासाठी ती सक्षम आहे. त्यामुळे ती वडिलांकडे पैशांची मागणी करु शकत नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Embed widget