Shah Faesal : 'आदर्शवादाने मला निराश केलं', शाह फैजल यांचे प्रशासकीय सेवेत परतण्याचे संकेत
Shah Faesal यांनी जानेवारी 2019 मध्ये देशातील वाढत्या असहिष्णुतेचे कारण देत प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता.
Shah Faesal : जम्मू आणि काश्मीरचे पहिले UPSC टॉपर आणि माजी IAS अधिकारी शाह फैजल यांनी पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत परतले आहेत. तीन वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा देत त्यांना राजकारणात प्रवेश केला होता. फैजल यांनी जानेवारी 2019 मध्ये देशातील वाढत्या असहिष्णुतेचे कारण देत प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. ट्विटरवर केलेल्या एका ट्वीटवरुन ते पुन्हा एकदा सेवेत परतणार असल्याची चर्चा रंगली होती. आता सरकारने त्यांना सेवेत सामावून घेतलं आहे. "आपण नव्याने सुरुवात करण्यास उत्सुक आहे," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शाह फैजल यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेला प्रशासकीय सेवेचा राजीनामा केंद्र सरकारने स्वीकारलाच नव्हता आणि आता त्यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्यात आलं आहे. राजीनामा दिल्यानंतर राजकीय पक्ष काढण्यापूर्वी ते 'एबीपी माझा'च्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. या कट्ट्यावर त्यांनी काश्मीरमधील समस्या आणि जनतेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
काश्मीरच्या परिस्थितीला राजकारणी जबाबदार : फैजल शाह
माजी IAS शाह फैजल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या आयुष्यातील 8 महिने (जानेवारी 2019-ऑगस्ट 2019) इतके कठीण होते की मी जवळजवळ थकलो होतो. एका कल्पनेचा पाठलाग करताना मी काही वर्षांमध्ये तयार केलेलं सर्वकाही जवळजवळ गमावलं. काम, मित्र, प्रतिष्ठा, सार्वजनिक सद्भावना सर्व. पण मी कधीच आशा सोडली नाही. माझ्या आदर्शवादाने मला निराश केलं."
शाह फैजल पुढे लिहितात, 'पण मला स्वतःवर विश्वास होता की मी केलेल्या चुका मी सुधारेन. आयुष्य मला आणखी एक संधी देईल. माझ्या आयुष्याचा एक भाग त्या 8 महिन्यांच्या आठवणींनी कंटाळला आहे आणि ते सगळं मला पुसून टाकायचं आहे. बरेच काही गमावले आहे, उर्वरित काळच सगळं मिटवून टाकेल.
माजी आयएएस शाह फैजल यांनी पुढे म्हटलंय की "आयुष्य सुंदर आहे आणि स्वतःला आणखी एक संधी देणे योग्य आहे फक्त ही गोष्ट शेअर करण्याचा विचार केला. अपयश आपल्याला मजबूत बनवतं. भूतकाळाच्या सावलीच्या पलीकडे एक अद्भुत जग आहे. मी पुढील महिन्यात 39 वर्षांचा होत आहे आणि पुन्हा सुरुवात करण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे."
8 months of my life (Jan 2019-Aug 2019) created so much baggage that I was almost finished.
— Shah Faesal (@shahfaesal) April 27, 2022
While chasing a chimera, I lost almost everything that I had built over the years. Job. Friends. Reputation. Public goodwill.
But I never lost hope.
My idealism had let me down. 1/3
शाह फैसल यांचं हे ट्वीट म्हणजे प्रशासकीय सेवेत त्यांचं पुनरागमन असल्याचे संकेत समजले जात होते. त्यानंतर सरकारने त्यांना सेवेत समाविष्ट करुन घेतलं. ट्विटरवर अनेक युजर्सनी त्यांचं स्वागत केलं आणि अनेकांनी त्यांना प्रश्नही विचारले.
कोण आहेत शाह फैसल?
- शाह फैसल हे जम्मू-काश्मीरचे पहिले UPSC टॉपर आहे.
- 2009 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल आल्याने फैसल चर्चेत आले होते.
- मात्र, जानेवारी 2019 मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याची घोषणा केली.
- यानंतर शाह फैसल यांनी मार्च 2019 मध्ये आपला नवीन प्रादेशिक राजकीय पक्ष स्थापन केला.