एक्स्प्लोर
Advertisement
काश्मीरच्या परिस्थितीला राजकारणी जबाबदार : फैजल शाह
मागील दहा वर्षात काश्मीरची राजकीय स्थिती खूपच खराब झाली. राजकीय प्रतिनीधींच्या धोरणामुळे काश्मिरी तरुणांची राजकीय विश्वासहर्ता कमी झाली आहे. त्यामुळे काश्मिरी तरुणांच्या मनात अस्वस्थता आहे, असा निष्कर्ष फैजल यांनी काढला आहे.
मुंबई : काश्मीरमधील अनियंत्रित परिस्थितीला राजकारणी जबाबदार आहेत, असं वक्तव्य माझी आयएएस आधिकारी फैजल शाह यांनी केलं आहे. फैजल शाह एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. काश्मीरची परिस्थिती सुधारायची असेल तर त्यासाठी काश्मीरमधील लष्करी ताकद कमी करायला हवी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
माझ्यासाठी प्रशासकीय सेवा महत्वाची होती, मात्र काश्मीरची राजकीय स्थिती खूपच खराब झाली आहे. त्यामुळे मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, असं फैजल शाह म्हणाले. मागील दहा वर्षात काश्मीरची राजकीय स्थिती खूपच खराब झाली. राजकीय प्रतिनीधींच्या धोरणामुळे काश्मिरी तरुणांची राजकीय विश्वासहर्ता कमी झाली आहे. त्यामुळे काश्मिरी तरुणांच्या मनात अस्वस्थता आहे, असा निष्कर्ष फैजल यांनी काढला आहे.
मागील सरकारने अनेक अश्वासनं दिली, मात्र ते पूर्ण करण्यामध्ये ते अयशस्वी झाले. 2018 हे वर्ष काश्मीरच्या इतिहासात रक्तरंजित वर्ष होतं. मागील पाच वर्षात जी काश्मीरमध्ये परिस्थिती झाली तशी परिस्थिती मी कधीच पाहिली नाही, असं फैजल शाह म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या माझ्यासाठी धक्कादायक घटना होती. त्यांची हत्या होईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. शुजात बुखारी काश्मीरचे खूप मोठे पत्रकार होते. त्यांच्या हत्येमुळे मी देश सोडण्याचा निर्णय घेतला. मी काही काळ अमेरिकेत राहिलो. मात्र त्यानंतर मी विचार केला की, सगळेच देश सोडून गेले तर परिस्थिती बदलणार कशी? त्यामुळे काश्मीरमधील स्थिती सुधारणा व्हावी यासाठी मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचं फैजल शाह यांनी सांगितलं.
कोण आहेत फैजल शाह ?
फैजल शाह माजी आयएएस आधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी परिक्षेत 2009 साली देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. प्रशासनामध्ये 10 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. सध्या काश्मीरच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या हेतूने त्यांनी मोर्चेबांधनी सुरु केली आहे. यूपीएससीत प्रथम येणारे फैजल शाह पहिले काश्मीरी होते. त्यांनी राजीनामा देऊन राजकारणासह काश्मीरमधील तरुणांना स्पर्धा परिक्षेत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement