कंटेन्मेंट झोनमधील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबतच्या 'त्या' सर्व्हे अहवालाचं ICMR कडून खंडन
कंटेन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच अनेकजण आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय ठिक झाल्याचं आयसीएमआरच्या सर्व्हेतून समोर आलं आहे, असं न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं होतं.
नवी दिल्ली : देशातील कंटेन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच यातील बरेच जण आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय ठिक झाल्याचं आयसीएमआरच्या सर्व्हेतून समोर आलं असल्याचं वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित केलं होतं. मात्र या वृत्ताचं आयसीएमआरने खंडन केलं आहे. आयसीएमआरने केलेल्या सेरो सर्व्हेचा अंतिम अहवाल अद्याप निश्चित झालेला नाही, असं आयसीएमआरने म्हटलं आहे.
The findings appeared in media related to ICMR Sero Survey for COVID-19 are speculative and survey results yet to be finalised. #IndiaFightsCorona @PIB_India @CovidIndiaSeva
— ICMR (@ICMRDELHI) June 9, 2020
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात काय म्हटलं?
मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, सूरत, जयपूर आणि इंदोर यांसारख्या शहरांच्या हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोनमधून मिळणाऱ्या आकड्यांच्या हवाल्याने आयसीएमआरने हा निष्कर्ष काढला आहे. या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा दर अत्यंत जास्त आहे. येथे इतर हॉटस्पॉटच्या तुलनेत 100 पटींनी जास्त संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं आहे. हा ICMR द्वारे करण्यात आलेला पहिला नॅशनल वाइड सीरो सर्व्हे आहे. या सर्व्हेच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल युनियन कॅबिनेट सेक्रेटरी आणि पीएमओलाही पाठवण्यात आलं आहे, असं या वृत्तात म्हटलं होतं
हा सर्वे रुग्णांकडून घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-2 (कोरोना व्हायरस) च्या विरोधात तयार होणाऱ्या IgG अॅन्टीबॉडिजचा शोध घेण्यासाठी करण्यात आला होता. दरम्यान, IgG अॅन्टीबॉडिज रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतात. हे शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनी दिसतात आणि संसंर्ग संपल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णांच्या रक्तात सीरममध्ये राहतात. हा सीरो सर्व्हे नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC), डब्ल्यूएचओ इंडिया आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या 70 जिल्ह्यांमधून जवळपास 24000 नमूने घेण्यात आले होते, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे. मात्र आयसीएमआरने या वृत्ताचं खंडन करत सर्व्हेचे अंतिम अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला, 200 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!
व्हिडीओ : जून 2019 पासूनच चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव; हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष