एक्स्प्लोर
लॉकडाऊन हटला नाही तर मे अखेरपर्यंत देशात 4 कोटी मोबाईल निकामी! : आयसीईए
देशात मोबाईलधारकांची संख्या 85 कोटी इतकी आहे. त्यात दर महिन्याला अडीच कोटी मोबाईलची विक्री होती. कोरोना लॉकडाऊनमुळे मोबाईल मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे.
नवी दिल्ली :
मोबाईल
हा सध्याच्या आधुनिक जीवनशैलीचा एक भागच बनलेला आहे. तो किती जीवनावश्यक आहे यावर मतमतांतरं असू शकतात. पण सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये मोबाईल शॉपवरची बंधनं हटली नाहीत तर येत्या मे अखेरीस देशात 4 कोटी लोकांसाठी त्यांचा मोबाईल हँडसेट निरुपयोगी होतील. हा आकडा अविश्वसनीय वाटत असला तरी इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन अर्थात आयसीईए या संस्थेनं आपल्या अहवालात हा दावा केला आहे.
मोबाईल विक्री आणि दुरुस्तीच्या दुकानांवर निर्बंध असल्यानं ही स्थिती ओढवू शकते असा दावा करण्यात आला आहे. सध्या अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत असल्यानं लॅपटॉप, इंटरनेट आधी सुविधांबाबतच्या उपकरणांना लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे. पण मोबाईलला मात्र ही सूट देण्यात आलेली नाही. मोबाईल सप्लाय चेनवरची ही बंधनं हटवण्यात यावीत यासाठी आपण पंतप्रधानांना विनंती केल्याचंही आयसीईएचे अध्यक्ष पंकज महिंद्रू यांनी म्हटलं आहे. सध्या देशात अडीच कोटी हँडसेट हे आवश्यक सेवा मिळत नसल्यानं निरुपयोगी ठरत असल्याचा अंदाज या संस्थेच्या अभ्यासात काढण्यात आला आहे.
देशात मोबाईलधारकांची संख्या 85 कोटी इतकी आहे. त्यात दर महिन्याला अडीच कोटी मोबाईलची विक्री होती. यात फोन जुना झाल्यानं अपग्रेडेड हँडसेट घेणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे.
सध्या देशात 2.5 कोटी मोबाईल हे योग्य सेवा न मिळाल्यानं निरुपयोगी झाले असल्याचा आयसीईएचा दावा आहे. आणि देशात मे पर्यंत लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास 4 कोटी लोकांचे हँडसेट निरुपयोगी होतील, असा दावा देखील केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement