एक्स्प्लोर
Advertisement
पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, मुलायम सिंहांनी ठणकावलं
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशामधील यादव कुटुंबातील कौटुंबिक युद्ध थांबताना दिसत नाही आहे. समाजावादी पक्षाचा अजूनही मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं मुलायम सिंह यांनी ठणकावलं आहे.
आज मुलायम सिंह पक्षाच्या लखनऊच्या कार्यालयात आले आणि कार्यकर्त्यांचीच शाळा घेतली. तंसच अखिलेश यादव यांची राष्ट्रीय अध्यक्ष आणि नरेश उत्तम यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षाची नेमप्लेटही काढून, त्या जागी मुलायम यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्षाची तर प्रदेशाध्यक्ष म्हणून शिवपाल यांच्या नावाची पाटी पुन्हा लावण्यात आली.
त्यानंतर पक्ष कार्यालयाला कुलूप ठोकून ते दिल्लीला रवाना झाले. तसंच रामगोपाल यादव पक्षात नाहीतच त्यामुळं 30 डिसेंबरला बोलावलेलं अधिवेश बेकायदेशीर असल्याचंही मुलायम सिंह यांनी म्हटलं आहे.
मुलायम सिंहांच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुलायम सिंह यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी शिवपाल यादव आणि अमर सिंह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने, मुलायम सिंह यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, मुलायम सिंह यादव यांनी आज सकाळी अखिलेश यादव यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी मुलायम यांनी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मान्य करणे, शिवपाल यादव यांना प्रदेश अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करणे, सोबतच तिकीट वाटपासंबंधी शिवपाल यांच्यासोबत बैठक घेऊन मतभेद दूर करावेत असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement