मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही; राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा
Rahul Gandhi on Hindutva : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मी हिंदू आहे मात्र, हिंदुत्ववादी नाही असे म्हटले. त्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.
Rahul Gandhi on Hindutva : जयपूर येथे महागाई विरोधात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपच्या हिंदुत्वादाच्या मुद्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नसल्याचे म्हटले. राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादामधील फरक सांगितला. राहुल गांधी हे हिंदूविरोधी असल्याची टीका सातत्याने भाजपकडून करण्यात येत आहे.
काँग्रेसच्या केंद्र सरकारविरोधातील रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी भाजपच्या धोरणांवरही टीका केली. यावेळी त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व यातील फरकही सांगितला. त्यांनी म्हटले की, हिंदू हा सर्व धर्मांना मानतो. तर, हिंदुत्ववादी हा कोणत्याही इतर धर्माला मानत नाही. तो फक्त हिंसाचारावर विश्वास ठेवतो.
मी हिंदू पण हिंदुत्ववादी नाही
राहुल गांधी यांनी मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही, असे म्हटले. मी हिंदू असून मी अहिंसेवर विश्वास ठेवतो. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते. केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी असून ते आपआपसात हिंसाचार घडवत आहेत. ही मंडळी सत्तेसाठी काहीही करू शकतात असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
प्रियांका गांधींचा हल्लाबोल
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांनी भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त असल्याची टीका प्रियांका यांनी केली. जयपूरमध्ये आज काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात, वाढत्या महागाईविरोधात 'महागाई हटाओ' रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी भाषणात प्रियांका यांनी केंद्र सरकार हे निवडक उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा
- आंदोलनातील शेतकरी घरी परतले, आमच्या जेवणाचं काय? शेकडोंच्या समोर पुन्हा पोटाचा प्रश्न!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha