वैवाहिक वादात पती-पत्नीने एकमेकांवर 60 हून अधिक खटले दाखल केले, सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' आदेश
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात एक अजब प्रकरण समोर आले, ज्यामुळे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती यांना आश्चर्याचा धक्का बसला.
Supreme Court : बुधवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एक अजब प्रकरण समोर आले, ज्यामुळे सरन्यायाधीश एनव्ही रमणा, त्यांच्या खंडपीठातील न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांना आश्चर्याचा धक्का बसला. हे प्रकरण वैवाहिक वादाचे होते, ज्यात पती-पत्नीने 41 वर्षांपासून एकमेकांवर 60 हून अधिक केसेस दाखल केल्या आहेत. लग्नाच्या तीस वर्षांनी विभक्त झाल्यानंतर या जोडप्यांनी हे खटले दाखल केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश
या प्रकरणी मध्यस्थी करण्याचे आदेश देताना सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी टिपण्णी केली की, काही लोकांना भांडणाची सवय असते, जर ते दिवसातून एकदाही कोर्ट पाहत नसतील तर त्यांना रात्री झोप येत नाही. रमण यांनी या वादावर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत.
सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले
जेव्हा हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आणले गेले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले, जेव्हा खंडपीठाला सांगण्यात आले की, या जोडप्याने त्यांच्या विभक्त झाल्याच्या 11 वर्षांत एकमेकांविरुद्ध 60 हून अधिक खटले दाखल केले आहेत. खंडपीठाने दोन्ही जोडप्यांना मध्यस्थी करण्याचे आदेश दिले. यासह, त्यांनी स्पष्ट केले की मध्यस्थी ही प्रक्रिया अनिर्वाय असल्याने, या कालावधीत दोघांना इतर प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.
संबंधित बातम्या