एक्स्प्लोर
कोर्टातच बायकोला ‘ट्रिपल तलाक’ देऊन पती फरार!
गोंडा (उत्तरप्रदेश): सध्या ‘ट्रिपल तलाक’च्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु असताना उत्तर प्रदेशमध्ये न्यायालयातच न्यायमूर्तीसमोर पतीनं तलाक दिला. गोंडा इथल्या कुटुंब न्यायालयात ही धक्कादायक घटना घडली.
सुनावणी सुरु असताना तीन वेळेस तलाक म्हणून पतीनं न्यायालयातून पळ काढला. हुंड्या प्रकरणी पीडितेच्या पतीला न्यायालयानं 14 एप्रिलला सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, पुढच्या सुनावणीच्यावेळी या पती महाशयानं न्यायालयात न्यायमूर्ती समोरच तोंडी तलाक दिला.
या घटनेनं त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महिलेनं आता या प्रकरणी जिल्हा न्यायालयात याचिका केली आहे.
‘ट्रिपल तलाक’बाबत अलाहाबाद हायकोर्टान काय मत व्यक्त केलं होतं?
‘मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, मुस्लिम महिलांना तोंडी तलाक देण्याची पद्धत ही क्रूर असून त्यामुळे महिलांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येत आहे.’ असं मत काही दिवसांपूर्वी अलाहाबाद हायकोर्टान का खटल्यादरम्यान व्यक्त केलं होतं.
तोंडी तलाकविरुद्ध काही महिलांनीही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना म्हटलं होतं की, तोंडी तलाक हा लैंगिक न्याय, समानता आणि संविधानाविरुद्ध आहे.
दरम्यान, तोंडी तलाक हा मुद्दा मुस्लिम समाजात अतिशय संवेदनशील आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने मात्र, या तोंडी तलाक पद्धतीचं समर्थन केलं आहे. बोर्डाचं म्हणणं आहे की, हा प्रश्न धार्मिक अधिकारात येतो. त्याला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकत नाही. पण काही महिला संघटनांनी तोंडी तलाक पद्धतीला विरोध केला आहे.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement