एक्स्प्लोर
नोटाबंदीमुळे भारताचा GDP घसरेल, HSBC आणि सिटी ग्रुपचा अंदाज
मुंबई : नोटाबंदीनंतर अनेक रेटिंग फर्मनी भारताचा जीडीपी कमी होण्याचा अंदाज वर्तवला होता. आता एचएसबीसी आणि सिटी ग्रुपने भारताचा जीडीपी घसरण्याचा अंदाज वर्तवला आहे. आर्थिक क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या एचएसबीसी आणि सिटी ग्रुपने जीडीपीबाबत नुकतीच एक आकडेवारी प्रसिद्ध केली.
एचएसबीसी आणि सिटी ग्रुपच्या अंदाजानुसार, नोटाबंदीमुळे भारतातील ग्रहाकांची खरेदी क्षमता आणि मागणी कमी झाली असून, याचा थेट परिणाम देशांतर्गत उत्पादनावर आणि पर्यायाने जीडीपीच्या वाढीवर पडेल.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (CSO) 2016-17 या आर्थिक वर्षाच्या जीडीपी वाढीचा अंदाज 7.6 टक्क्यांहून कमी होऊन 7.1 टक्के असा वर्तवला आहे.
एचएसबीसीच्या एका रिपोर्टनुसार, जीडीपी वाढ 2016-2017 या आर्थिक वर्षात सीएसओच्या अंदाजापेक्षाही कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. चालू वर्षात जीडीपी वाढ 6.3 टक्के राहू शकते, असाही अंदाज या रिपोर्टमध्ये सांगण्यात आला आहे.
सिटी ग्रुपने दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, नोटाबंदीमुळे खरेदी क्षमतेवर परिणाम झाला आह आणि यामुळे खासगी गुंतवणुकीवरही मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सिटी ग्रुपच्या अंदाजानुसार, चालू वर्षात जीडीपीचा विकास दर 6.8 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement