एक्स्प्लोर

केंद्राकडून कॉलेज रँकिंग जाहीर, महाराष्ट्रातील कोणतं कॉलेज टॉप?

नवी दिल्ली : देशातल्या शिक्षण संस्थांचं त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे रँकिंग आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जाहीर केलंय. खरंतर महाविद्यालयं, शिक्षणसंस्थांची गुणवत्ता तपासण्याचं काम नॅक, एनबीए यासारख्या संस्था याआधी करत होत्या. पण यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी मोदी सरकारनं मागच्या वर्षीपासून इंडिया रँकिंग या नावानं अशा पद्धतीनं शैक्षणिक संस्थांचं रॅकिंग सुरु केलंय. विद्यापीठं, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी यासारख्या विविध वर्गात ही रॅकिंग जाहीर करण्यात आलीय. सगळ्यात विशेष म्हणजे यावर्षी या रँकिंगमध्ये पहिल्यांदाच सर्वसाधारण महाविद्यालयांचा समावेश करण्यात आलेला होता. देशातल्या शंभर टॉप कॉलेजेसची यादी केंद्र सरकारनं जाहीर केलीय. विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ दहाव्या क्रमाकांवर, इंजिनियरिंगमध्ये आयआयटी बॉम्बे, शिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या महाराष्ट्रातल्या काही संस्थानी आपला नावलौकिक ठेवला असला, तरी सर्वसाधारण महाविद्यालयांच्या कामगिरीत मात्र महाराष्ट्र मागे पडलेला आहे. ज्या पुण्याला आपण मराठी लोक विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्यातली कॉलेजेसही या यादीत फारसी छाप पाडू शकलेली नाहीयेत. या कॉलेजेसच्या या यादीत महाराष्ट्रातलं पहिलं नाव हे 30 व्या क्रमांकावर सापडतं. पुण्यातल्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या महाविद्यालयानं हा क्रमांक पटकावलाय. तर 35 व्या क्रमाकांवर पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज आहे. त्यानंतर पाठोपाठ 36 वा क्रमांक आहे अमरावतीच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशननं. तर मुंबईत ज्या कॉलेजचं नाव एरवी सगळ्यांच्या तोंडावर असतं ते झेवियर्स कॉलेज 40 स्थानावर आहे. मुंबई-पुण्याबाहेरचे कॉलेज पहिल्या शंभरात ! विशेष म्हणजे मुंबई-पुण्याबाहेरच्या काही कॉलेजसनं मात्र आश्चर्यकारकरीत्या किमान देशातल्या शंभरात स्थान मिळवलंय. त्यात कोल्हापुरातलं विवेकानंद कॉलेज हे 58 व्या स्थानावर, नांदेड एज्युकेशन सोसायटीज सायन्स कॉलेज हे 72 व्या स्थानावर, उस्मानाबाद जिल्ह्यातलं साई कॉलेज ऑफ कंप्युटर एज्युकेशन हे 83 व्या स्थानावर तर वर्ध्यातलं जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायन्स हे 88 व्या स्थानावर आहे. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठाचं सांगलीतलं मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय हे देशात 99 व्या स्थानावर आहे. तर पुण्यातल्या नामांकित सिम्बॉयसिसचा या यादीतला क्रमांक 81 इतका आहे. दिल्लीचा दबदबा! विद्यापीठं, इंजियनरिंग, मॅनेजमेंट इन्स्टिट्युटचं रॅकिंग मागच्या वर्षीही काढलं गेलं होतं. शिवाय त्यात अनेक अपेक्षित संस्थांनीच, म्हणजे ज्यांना केंद्रीय निधी मिळतो त्यांनीच नंबर पटकावलेत. पण अशा प्रकारे महाविद्यालयीन रॅकिंग मात्र पहिल्यांदाच काढलं गेलंय. त्यामुळे या यादीची चर्चा जास्त होतेय. या यादीत दबदबा आहे तो मात्र राजधानी दिल्लीचा. पहिल्या 10 मध्ये दिल्लीतली बहुतांश कॉलेजेस आहेत. तर संख्याबळानुसार तामिळनाडू या दक्षिणेतल्या राज्याची कॉलेजस सर्वाधिक टॉपवर आहेत. देशातली टॉप टेन कॉलेजची यादी पुढीलप्रमाणे :
  1. मिरांडा हाऊस, दिल्ली
  2. लोयोला कॉलेज, चेन्नई, तामिळनाडू
  3. श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, नवी दिल्ली
  4. बिशॉप हेबेर कॉलेज, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू
  5. आत्मा राम सनातन धर्म कॉलेज, नवी दिल्ली
  6. सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता, पश्चिम बंगाल
  7. लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेन्स, नवी दिल्ली
  8. दयाल सिंह कॉलेज, दिल्ली
  9. दिनदयाल उपाध्याय कॉलेज, नवी दिल्ली
  10. दि वुमेन्स ख्रिश्चन कॉलेज, चेन्नई, तामिळनाडू
महाराष्ट्रातली कॉलेज कुठल्या स्थानावर :
  1. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बाय टेक्नॉलॉजी, पुणे (क्रमांक – 30)
  2. फर्ग्युसन, पुणे (क्रमांक – 35)
  3. डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती (क्रमांक – 36)
  4. सेंट झेवियर्स, मुंबई (क्रमांक – 40)
  5. विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (क्रमांक – 58)
  6. नांदेड एज्युकेशन सोसायटीज सायन्स कॉलेज (क्रमांक – 72)
  7. सिम्बॉयसिस, पुणे (क्रमांक – 81)
  8. साई कॉलेज ऑफ कंप्युटर एज्युकेशन, जिल्हा उस्मानाबाद (क्रमांक – 83)
  9. जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा (क्रमांक – 88)
  10. भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, जिल्हा सांगली (क्रमांक – 91)

महत्त्वाच्या बातम्या

Miss World 2026 :  डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Embed widget