(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi On BJP : चारशेचा नारा देणाऱ्या भाजपला किती जागा मिळतील? राहुल गांधींनी सांगितली धक्कादायक आकडेवारी
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जागांच्या संख्येबाबत मोठे भाकीत केले आहे. राहुल गांधी यांनी दावा केला की, यावेळी भाजपला केवळ 150 जागा मिळतील.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) उत्साहात एकीकडे भाजपने एनडीए 400 हून अधिक जागा जिंकेल असा दावा केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जागांच्या संख्येबाबत मोठे भाकीत केले आहे. आज राहुल गांधी यांनी दावा केला की, यावेळी भाजपला केवळ 150 जागा मिळतील.
15-20 दिन पहले मुझे लग रहा था भाजपा 180 सीटों तक जाएगी, पर अब ज़मीनी रिपोर्ट्स बता रही हैं कि वो 150 से भी आगे नहीं बढ़ने वाले।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 17, 2024
INDIA गठबंधन मज़बूती से चुनाव लड़ रहा है और देश भर में जबरदस्त अंडरकरेंट है। pic.twitter.com/JdFtwtBtMF
गाझियाबादमध्ये अखिलेश यादव यांच्यासमवेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण देशात प्रचंड अंडरकरंट आहे. ते म्हणाले क, "मी जागांचा अंदाज लावत नाही. 15-20 दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की, भाजप 180 जागा जिंकेल, पण आता मला वाटते की त्यांना 150 जागा मिळतील. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की आम्ही कामगिरी सुधारत आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आमची आघाडी खूप मजबूत आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू."
भाजप संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे
राहुल गांधी म्हणाले, 'ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे आरएसएस आणि भाजप संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत 2-3 मोठे मुद्दे असतात. बेरोजगारी आणि महागाई ही सर्वात मोठी समस्या आहे, पण भाजप लक्ष वळवण्यात व्यग्र आहे, या प्रश्नांवर ना पंतप्रधान बोलतात ना भाजप बोलते.
तरुणांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी, चुकीचा जीएसटी लागू करून आणि अदानींसारख्या मोठ्या अब्जाधीशांना पाठिंबा देऊन रोजगार निर्मितीची व्यवस्था कमी केली आहे. पहिले काम म्हणजे पुन्हा एकदा रोजगार बळकट करणे, यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात 23 कल्पना दिल्या आहेत, एक कल्पना क्रांतिकारी आहे शिकाऊ उमेदवारीचा अधिकार. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही उत्तर प्रदेशातील सर्व पदवीधर आणि पदविकाधारकांना शिकाऊ प्रशिक्षणाचा अधिकार देऊ. प्रशिक्षण असेल आणि आम्ही तरुणांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करू आणि आम्ही हे हक्क करोडो तरुणांना देत आहोत, पेपरफुटीसाठीही कायदा करू.
इतर महत्वाच्या बातम्या