एक्स्प्लोर
Advertisement
सचिन आणि रेखा यांची राज्यसभेत किती हजेरी, किती पगार?
नवी दिल्ली : अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील उपस्थितीवरुन समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. फॅक्टली डॉट इन या वेबसाईटने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार रेखा आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्या राज्यसभेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे समोर आले आहे.
सचिन तेंडुलकर आणि रेखा यांची एप्रिल 2012 मध्ये राष्ट्रपतींकडून खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रेखा आणि सचिन यांची उपस्थिती किती आणि पगार किती?
अभिनेत्री रेखा यांनी खासदार म्हणून नियुक्ती झाल्यापासून केवळ 18 दिवस (5.17 टक्के) हजेरी लावली, तर सचिन तेंडुलकर यांनी खासदार म्हणून नियुक्ती झाल्यापासून केवळ 23 दिवस (6.61 टक्के) हजेरी लावली.
विशेष म्हणजे रेखा यांना 18 दिवसांसाठी 65 लाख 4 हजार 942 रुपये पगार, तर सचिन तेंडुलकर यांना 23 दिवसांसाठी 58 लाख 86 हजार 825 रुपये पगार मिळाला.
रेखा आणि सचिन यांची राज्यसभेत किती प्रश्न उपस्थित केले?
अभिनेत्री रेखा यांनी गेल्या 5 वर्षात राज्यसभेत एकही प्रश्न उपस्थित केला नाही. सचिन तेंडुलकर यांनी एकूण 23 प्रश्न विचारले. राष्ट्रपती नियुक्त खासदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न केटीएस तुलसी यांनी विचारले.
किती चर्चांमध्ये रेखा आणि सचिन यांचा सहभाग?
सचिन आणि रेखा यांची राज्यसभेतील चर्चांसंबंधी आकडेवारी अत्यंत निराशाजनक आहे. दोघांनी राज्यसभेतील एकाही चर्चेत सहभाग घेतला नाही. तर दुसरीकडे बॉक्सर एम सी मेरी कोम यांनी दोन चर्चांमध्ये सहभाग घेतला. इथेही केटीएस तुलसी यांनीच सर्वाधिक म्हणजे 54 चर्चांमध्ये सहभाग नोंदवला.
राष्ट्रपती नियुक्त 12 खासदार सध्या राज्यसभेत आहेत. विविध क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींना राष्ट्रपती खासदार म्हणून राज्यसभेत पाठवतात. आपापल्या क्षेत्रासोबत महत्त्वाच्या विषयांवर काम करण्याची संधी त्यांना दिली जाते. मात्र, राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या सध्याच्या खासदारांपैकी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांची कामगिरी निराशाजनक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement