भारतातील 'हे' नेते मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान बनले, नरेंद्र मोदींशिवाय यादीत कुणाची नावं?
CM Became PM of India : राजकारणात मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा प्रवास सोपा नसतो. भारतातील काही नेते मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान बनले.

नवी दिल्ली : भारताच्या राजकारणात काही नेते मुख्यमंत्री पदापासून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. भारतात आतापर्यंत 14 पंतप्रधान झाले आहेत. 14 पैकी 6 नेते अगोदर कोणत्या तरी राज्याचे मुख्यमंत्री होते जे नंतर पंतप्रधान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच ते राष्ट्रीय राजकारणात सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत.
एका दिवसात मुख्यमंत्री ते पंतप्रधान
1996 मध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा संयुक्त मोर्चानं पाठिंबा देत मुख्यमंत्री एचडी देवगौडा यांना पंतप्रधान म्हणून निवडलं. 31 मे रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत ते 1 जूनला भारताचे 11 वे पंतप्रधान बनले.
25 वर्षानंतर एखाद्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधानपद
स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते.1952 ते 1956 मध्ये ते मुख्यमंत्री होते. 1977 मध्ये ते देशाचे पहिले बिगर काँग्रेस सरकारचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांचं सरका पुढच्या 2 वर्षापर्यंत चाललं.
उत्तर प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले चौधरी चरण सिंह हे देखील पंतप्रधान झाले. त्याचा कार्यकाळ कमी होता. ते शेतकऱ्यांचे नेते होते.
उत्तर प्रदेशचे 12 वे मुख्यमंत्री व्ही.पी. सिंग हे देखील पंतप्रधान बनले. 1980 ते 1982 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. जनता दलाकडून ते 1989 मध्ये पंतप्रधान झाले.
आंध्र प्रदेशचे चौथे मुख्यमंत्री नरसिंह राव हे देखील पुढं पंतप्रधान झाले. ते 1971 ते 1973 या कालावधीत आध्रचे मुख्यमंत्री होते. ते 1991-96 मध्ये भारताचे नववे पंतप्रधान होते. त्यांच्या काळात उदारीकरण झालं.
नरेंद्र मोदी हे 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनले. ते सलग चारवेळा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते 2014 मध्ये पंतप्रधान बनले. त्यांची तिसरी टर्म सुरु आहे.
























