एक्स्प्लोर
Advertisement
यूपीतील यशानंतर भाजपला केंद्रात काय फायदा?, राज्यसभेचं गणित
मुंबई : देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये बहुमताने विजय मिळवल्यानंतर भाजपला त्याचा केंद्रात फायदा होणार आहे. 2018 मध्ये भाजपचं राज्यसभेतील संख्याबळ 11 ने वाढणार आहे. कारण एकूण 68 राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ 2018 मध्ये संपणार आहे.
उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 31 राज्यसभा खासदार येतात. 31 पैकी सध्या सपा 18, बसपा 6, 1 अपक्ष, 3 भाजप आणि राष्ट्रपती नियुक्त 3 खासदार आहेत. मात्र उत्तर प्रदेशमध्ये 300 पेक्षा अधिक जागा मिळाल्याने भाजपचे आता 8 पेक्षा अधिक खासदार निवडून येऊ शकतात.
मायावतींचं राज्यसभा सदस्यत्व धोक्यात
एका राज्यसभा खासदाराला 34 आमदारांच्या मतदानाची गरज असते. त्यामुळे बसपाच्या अध्यक्षा मायावतींचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा निवडून येणं त्यांच्यासाठी अडचणीचं असेल. कारण बसपाला निवडणुकीत केवळ 19 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर सपालाही एकच जागा लढवता येईल, एवढ्या म्हणजे 47 जागा मिळाल्या आहेत.
राज्यसभेचं गणित
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 68 खासदारांपैकी 58 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल 2018 मध्ये संपणार आहे. यापैकी 10 खासदार उत्तर प्रदेशचे, तर एक उत्तराखंडचा आहे.
राज्यसभेत एकूण 245 जागा आहेत. यापैकी एनडीएकडे सध्या 74 जागा आहेत (भाजप 56), तर यूपीएकडे 65 (काँग्रेस 59) जागा आहेत. दोन्हीही पक्ष 123 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत.
2019 पर्यंत एनडीएच्या उत्तर प्रदेशमधून 10, तर उत्तराखंडमधून एक जागा वाढेल. त्यामुळे एनडीएचं एकूण संख्याबळ 85 होईल, तर यूपीएच्या जागा घटून 65 एवढं संख्याबळ होईल. पंजाब आणि मणिपूरमधील राज्यसभेच्या जागांचा कार्यकाळ 2019 पर्यंत संपणार नाही, त्यामुळे दोन्हीही पक्ष 123 या मॅजिक फिगरपर्यंत पोहचू शकणार नाहीत.
भाजपला काय फायदा?
एनडीएचं संख्याबळ लोकसभेत मोठं असलं तरी राज्यसभेत सरकारला एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी यूपीएच्या सदस्यांचा पाठिंबा घ्यावा लागतो. त्यामुळे संख्याबळ वाढल्याने सरकारचा हा अडथळा दूर होईल. शिवाय राष्ट्रपतीपदासाठी भाजपला पसंतीचा उमेदवार देता येईल.
2019 निवडणुकीपूर्वी होणाऱ्या निवडणुका
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक महत्वाच्या राज्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुका होणाऱ्या राज्यांपैकी 3 राज्यात काँग्रेसची, तर 7 राज्यात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा यांसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. तर मिझोराम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड यांसारख्या छोट्या राज्यांमध्येही निवडणुका होतील.
गुजरात, मेघालय, नागालँड आणि हिमाचल प्रदेशमध्ये 2017 च्या अखेरीस निवडणुका लागू शकतात. गुजरातमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे, तर नागालँडमध्ये युती आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आणि मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
2018 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुका होतील. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता वाचवण्याचं आव्हान भाजपसमोर असेल. तर काँग्रेसलाही कर्नाटक आणि मिझोराममध्ये भाजपशी दोन हात करावे लागतील.
अरुणाचल प्रदेश, सिक्किम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात 2019 च्या सुरुवातीला निवडणुका होतील. लोकसभा निवडणुकांसोबतच या निवडणुका होतील, असंही बोललं जातं.
2018 मधील राज्यसभेचं चित्र
उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपला 2018 च्या राज्यसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. 2018 मध्ये भाजपचे एकूण 11 सदस्य वाढणार आहेत. कारण पुढच्या वर्षी कार्यकाळ संपणाऱ्या 68 जागांपैकी 11 जागा उत्तर प्रदेशातील आहेत. त्यापैकी 8 ते 9 जागांवर भाजपला विजय मिळवता येईल. तर उत्तराखंडमध्ये एक जागा आहे. आणि मित्रपक्षांच्या वाढणाऱ्या जागा मिळून एनडीएच्या एकूण 11 जागा वाढतील.
उत्तर प्रदेशमध्ये कार्यकाळ संपणाऱ्या 10 जागांपैकी भाजपचे 8 सदस्य निवडून येऊ शकतात. तर मित्रपक्षांच्या मदतीने भाजपला आणखी एक सदस्य म्हणजे संख्याबळ 9 करण्याची संधी आहे. तर 47 जागांवर विजय मिळवलेल्या सपाला एक जागा लढवता येईल.
दिल्लीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं संख्याबळ नाही. सत्ताधारी आपला 3 जागा मिळवता येतील.
गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांच्या निवडणुका 2018 मध्ये होणार असल्याने भाजपच्या जागांचं गणित या निवडणुकांवर अवलंबून असेल.
सध्या भाजप कुठे-कुठे?
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील 12 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. मणिपूर आणि गोव्यात सत्ता स्थापन करण्यास भाजपला यश मिळाल्यास हा आकडा 14 होईल. अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश या राज्यात भाजप मित्रपक्षांसोबत सत्तेत सहभागी आहे. तर इतर 9 राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे.
काँग्रेसची सत्ता कुठे-कुठे?
- पंजाब
- हिमाचल प्रदेश
- कर्नाटक
- मेघालय
- मिझोराम
संबंधित बातम्या :
देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य
पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र
पाच राज्यात सर्वाधिक मताधिक्य कुणाला?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement