एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्राम्होस एअरोस्पेसची गुपितं फोडणाऱ्या निशांतपर्यंत पोलीस कसे पोहचले?
ब्राह्मोस एअरोस्पेसच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हेरगिरीचा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईत नागपुरात ही अटक मोहीम पार पाडली. पण मुळात एटीएस या इंजिनीयरपर्यंत पोहचली कशी?
नवी दिल्ली: भारताच्या ब्राह्मोस मिसाईलची गुपितं पाकिस्तानसोबत शेअर करणाऱ्या इंजिनीअर निशांत अग्रवालच्या अटकेनं खळबळ उडाली आहे. ब्राह्मोस एअरोस्पेसच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हेरगिरीचा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईत नागपुरात ही अटक मोहीम पार पाडली. पण मुळात एटीएस या इंजिनीयरपर्यंत पोहचली कशी?
27 वर्षांचा निशांत अग्रवाल उत्तराखंडच्या रुरकीमधला. कुरुक्षेत्रच्या नॅशनल इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीधून शिक्षण घेतल्यानंतर, तो गेल्या 4 वर्षांपासून ब्राह्मोस एअरोस्पेसमध्ये काम करत होता. कॉलेजपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. पण गेल्या 2 वर्षांपासून तो फेसबुकवरुन पाकिस्तानातल्या दोन महिलांच्या अकाऊंटवर चॅट करत होता. धक्कादायक म्हणजे ज्यांना तो महिला समजून चॅट करत होता, ते अकाऊंट पुरुषांनीच बनवलेलं एक बनावट अकाऊंट होतं.
गेल्या महिन्यात पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या नोएडामधून एका बीएसएफ जवानाला अशाच पद्धतीनं गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक केली होती. ही केसही हनीट्रॅपचीच होती. अच्युतानंदन मिश्रा असं या बीएसएफ जवानाचं नाव. त्याची चौकशी करत असतानाच या दोन पाकिस्तानी अकाऊंटची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी या अकाऊंटवर भारतातून कोण कोण चॅट करतंय यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. याच निगराणीत निशांत अग्रवाल पोलिसांच्या हातात लागला. तो ज्या बनावट महिलांच्या अकाऊंटवर चॅट करत होता, ते अकाऊंट पाकिस्तानातून हाताळलं जात असल्याचे पक्के पुरावे पोलिसांकडे आहेत.
पाकिस्तानच्या आयएसआयला ब्राह्मोस एअरोस्पेसची काही गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप निशांतवर आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीचं काम ही संस्था करतेय. भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असं हे क्षेपणास्त्र. भारतातली ब्रम्हपुत्रा आणि रशियातली मॉस्को या दोन नद्यांची नावं जोडून हे नाव बनव ण्यात आलं. तीनशे किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची ताकद या क्रूझ मिसाईलमध्ये आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे धागेदोरे अजून बरेच लांबपर्यंत जाऊ शकतात. कारण या फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात अजूनही दोन भारतीय सुरक्षा अधिकारी असल्याचा संशय आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आएसआयचं हे जाळं अजून किती लोकांपर्यंत पसरलंय हे लवकरच कळेल.
संबंधित बातमी
ब्राह्मोसची माहिती पाकला दिल्याचा आरोप, नागपुरातून इंजिनीअरला अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement