एक्स्प्लोर

DRDO शास्त्रज्ञ हनी ट्रॅप प्रकरणी मोठी अपडेट, शास्त्रज्ञाने ब्रह्मोस-अग्नी सारख्या क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानला पुरवली

Dr. Pradip Kurulkar Spy Case : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेले डीआरडीओचे वैज्ञानिक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या आरोपपत्रात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.

DRDO Scientist Honey Trap Case : DRDO शास्त्रज्ञ हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) यांनी ब्रह्मोस-अग्नी आणि युसीव्ही सारख्या क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानला पुरवली असल्याचं समोर आलं आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation) च्या शास्त्रज्ञाला हनी ट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न होता. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेले डीआरडीओचे वैज्ञानिक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या आरोपपत्रात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.

DRDO शास्त्रज्ञ हनी ट्रॅप प्रकरणी मोठी अपडेट

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) विशेष न्यायालयात कुरुलकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये सांगितल्याप्रमाणे, डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिला गुप्तचराला भारतीय क्षेपणास्त्र, ड्रोन आणि रोबोटिक्स संदर्भातील माहिती पुरवल्याचं समोर आलं आहे. एटीएसने 30 जून रोजी डॉ. कुरुलकर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्यामध्ये ही माहिती उघड झाली आहे.

ब्रह्मोस-अग्नी क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानला पुरवली

एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, पाकिस्तानी एजंटने डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासोबत सोशल मीडियावर संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी बनावट खाती तयार केली. यापैकी दोन खाती झारा दासगुप्ता आणि जुही अरोरा या नावाने होती. प्रदीप यांच्यासोबत झारा दासगुप्ता नावाच्या आयडीवरून चॅट करणाऱ्या पाकिस्तान एंजेटने ती ब्रिटनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचं सांगितलं होतं. झाराने प्रदीप यांच्यासोबत मैत्री केली. यानंतर या पाकिस्तानी एजंटने कुरुलकर यांच्याकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र, अग्नी क्षेपणास्त्र आणि मिलिटरी बिडिंग सिस्टम, ड्रोन, यूसीव्ही आणि इतर गोष्टींची माहिती मागितली. त्यानंतर प्रदीप यांनी ही सर्व माहिती गोळा करून त्या पाकिस्तानी एजंटला पाठवली.

प्रदीप कुरुलकर झारासमोर आपल्या कामाची फुशारकी मारत असे, असंही आरोपपत्रात म्हटलं आहे. एटीएसने दाखल केलेल्या 1837 पानांच्या आरोपपत्रात मोठ्या बाबी उघड झाल्या आहेत. यातील एका चॅटमध्ये, पाकिस्तानी एजंटांनी अग्नी-6 लाँचर चाचणी यशस्वी झाली का, असं विचारलं. ज्यावर कुरुलकर यांनी उत्तर दिलं होतं की, "लाँचर हे माझं डिझाइन आहे. हे एक मोठं यश आहे. कुरुलकर आणि पाकिस्तानी एजंट्समधील हा चॅट सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यानचा आहे.

काय आहे प्रकरण?

डीआरडीओच्या पुण्यातील संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना एटीएसकडून अटक करण्यात आली होती. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला काही संवेदनशील माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला. डीआरडीओ ही सरकारी संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या वैज्ञानिकाने पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याने एकच खळबळ उडाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget