एक्स्प्लोर

 Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार; अमित शाहांचा विश्वास 

Amit Shah Exclusive : येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एबीपी अस्मिताने खास मुलाखत घेतली. यावेळी अमित शाह यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये (Gujarat) सध्या ज्या प्रकारचे राजकीय वातावरण आहे, ते पाहून भाजपच्याच (BJP) बाजूने लोकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व पाहून आम्ही आमच्याच पक्षाचे पूर्वीचे विक्रम मोडून पुन्हा एकदा प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांची एबीपी अस्मिताने खास मुलाखत घेतली. यावेळी अमित शाह यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे. परंतु, अनेक संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला 131 ते 139 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. यावर बोलताना अमित शाह यांनी सांगितले की, गुजरातच्या लोकांमध्ये, तरुणांमध्ये,  शेतकऱ्यांमध्ये आणि विशेषत: गुजरातच्या महिलांमध्ये विश्वासाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हे पाहता आम्ही निश्चितपणे आमचे सर्व विक्रम मोडीत काढू आणि बहुमताने सरकार स्थापन करू. 

गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकीआधी गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, "समान नागरी कायदा लागू करणे हे जनसंघाच्या स्थापनेपासून आमच्या अजेंड्याचा भाग आहे. समान नागरी कायदा ही भारतीय जनता पक्षाची देशातील जनतेशी असलेली बांधिलकी आहे.  समान नागरी कायदा असावा हे जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षापर्यंतच्या आमच्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग आहे. परंतु, काँग्रेसकडून पहिल्यापासूनच याला विरोध केला जातोय. काँग्रेसने पहिल्यापासून तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे.  राज्यघटनेत कलम 44 अन्वये गार्डियन प्रिंसिपल दिले गेले आहे, ज्यामध्ये राज्यघटनेच्या रचनाकारांची अशी अपेक्षा होती की भविष्यात देशाच्या संसदेने, देशाच्या विधिमंडळांनी समान नागरी कायदा आणावा. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर कोणताही कायदा नसावा. कलम 14 आणि कलम 15 दोन्ही स्पष्ट करतात की कोणत्याही व्यक्तीला समान वागणूक दिली पाहिजे. धर्माच्या आधारावर कुणालाही विशेष वागणूक मिळू नये, कुणावर अन्याय होऊ नये.  

"बूथ कार्यकर्त्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि निष्ठेने सरकार चालवताना केलेल्या चांगल्या कामाचे फळ भाजपला मिळेल. त्यामुळे प्रचंड बहुमताने जुना विक्रम मोडीत काढत भारतीय जनता पक्ष 2022 च्या निवडणुका पुन्हा जिंकेल. आम आमदी पक्षाकडून गुजरातमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. परंतु, 1960 पासून गुजरातमध्ये शिक्षण मोफत आहे. ज्याप्रकारे गुजरातमध्ये विकास झाला आहे, गुजरातमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचे निकाल मिळाले आहेत, देशातील गुजरात सोडा, 370 ची कलम नरेंद्र मोदी इतक्या खंबीरपणे उखडून टाकतील याची कल्पनाही देशात कोणीही करू शकत नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. 

अमित शाह म्हणाले, "भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा संकल्प हा आहे की, जगात देशाने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहावे. 2047 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी भारत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असेल. प्रत्येक क्षेत्रात भारताने प्रगती केली पोहिजे. 

महत्वाच्या बातम्या

 Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होणार का? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget