एक्स्प्लोर

GK: 'या' ट्रेनला मार्ग देण्यासाठी राजधानीसारख्या आलिशान ट्रेनलाही थांबावं लागतं; तुम्हाला याबद्दल माहित आहे का?

High Priority Train: सहसा राजधानी आणि जनशताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेन्सला मार्ग देण्यासाठी इतर गाड्या थांबवल्या जातात. पण देशात अशीही ट्रेन आहे जिला मार्ग देण्यासाठी अनेक आलिशान ट्रेन थांबवल्या जातात.

High Priority Train: कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रेल्वेची (Railway) भूमिका खूप महत्त्वाची असते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतही भारतीय रेल्वेचा मोठा वाटा आहे. भारतीय रेल्वेतून दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. रेल्वेच्या माध्यमातून लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पोहोचतात. ट्रेन हा प्रवासाच्या इतर साधनांपेक्षा खूपच स्वस्त पर्याय आहे.

आजच्या काळात भारतीय रेल्वे दररोज हजारो गाड्या चालवत आहे. कालांतराने रेल्वे गाड्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांमध्येही बरेच बदल झाले आहेत. भारतीय रेल्वेने रुळांमध्ये सुधारणा करून गाड्यांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. रेल्वेकडून अनेक प्रिमियम गाड्याही चालवण्यात येतात. यामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस, देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जाणारी गतिमान एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि इतर अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

या ट्रेनला मार्ग देण्यासाठी सुपरफास्ट ट्रेनलाही थांबवतात

राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) आणि जनशताब्दी एक्सप्रेसला (Janshatabdi Express) मार्ग देण्यासाठी इतर रेल्वे गाड्यांना थांबवलं जातं, हे तर तुम्हाला माहितीच असेल. पण भारतात एक अशीही ट्रेन आहे, जिच्यासाठी अगदी प्रवासी लोकलपासून ते आलिशान एक्सप्रेस गाड्यांपर्यंत मार्गावरील सर्व गाड्यांना थांबावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे का?

तर होय, भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये अशी एक ट्रेन देखील आहे, जिला मार्ग देण्यासाठी जनशताब्दी, राजधानीसारख्या प्रीमियम ट्रेन्सला देखील थांबवलं जातं. या ट्रेनचं नाव आहे- अ‍ॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट (Accident Relief Medical Equipment), रेल्वे अपघातात याचा वापर केला जातो. अपघातग्रस्त स्थळांपर्यंत मेडिकल सुविधा पोहोचवण्यासाठी या ट्रेनचा वापर केला जातो. अ‍ॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ही लाल रंगाची ट्रेन असते, जी रुळावरुन धावत असताना मागच्या आणि पुढच्या सर्व रेल्वे गाड्यांना सिग्नल दिला जातो आणि त्या थांबवल्या जातात.

राष्ट्रपतींच्या गाडीला दिला जातो रस्ता

भारताचे राष्ट्रपती जर कुठे ट्रेनने जात असतील, तर त्यांच्या ट्रेनला रस्ता देण्यासाठी सर्व गाड्या थांबवल्या जातात. मात्र, आजच्या काळात राष्ट्रपती हे क्वचितच रेल्वेने प्रवास करतात.

हेही वाचा:

Onion Price Reduced: टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही स्वस्त; 25 रुपये किलोने होणार विक्री, 'या' दिवसापासून सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget