एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cloud Brust: नक्की कोणत्या कारणामुळे ढगफुटी होते? अशा वेळी एकाच भागात जोरदार पाऊस पडतो का? जाणून घ्या...

Cloud Bursting: ढगफुटीबद्दल बोलायचं झालं तर आपल्या डोळ्यासमोर ढगांचं दृश्य समोर येतं जे फुटून त्यातून भरपूर पाऊस पडतो.

What is Cloud Bursting: देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं (Monsoon) आगमन झालं असून काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या (Land Slide) घटना घडत आहेत. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी ढगफुटीच्या (Cloud Burst) घटना घडल्या असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण ही ढगफुटी नेमकी होते कशी? याबद्दल आज जाणून घेऊया.

ढगफुटी म्हणजे काय?

जेव्हा आपण ढगफुटीबद्दल (Cloud Burst) बोलतो तेव्हा सर्वात आधी काळे ढग फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत असल्याचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. पण नक्की हे असंच घडतं का? वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं, तर ढगफुटीचा अर्थ "अचानक कोसळलेला मुसळधार पाऊस". भारतीय हवामान विभागाने (IMD) ठरवलेल्या प्रमाणानुसार, एका तासात 100 मिमी पाऊस पडल्यास त्याला ढगफुटी म्हणतात. ढगफुटी झाल्यास 100 मिमी किंवा त्याहून जास्त पाऊस अनपेक्षितपणे पडतो.

ढग का फुटतात?

ढग फुटणे (Cloud Bursting) म्हणजे एखाद्या विशिष्ट भागात आकाशातून जोरदार पाऊस कोसळणे. ज्या भागात ढगफुटी होते, त्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. जेव्हा पाण्याने भरलेले ढग ठराविक ठिकाणी थांबतात आणि त्यांच्यातील पाण्याचे थेंब भरपूर प्रमाणात एकत्र येतात, तेव्हा ढग फुटतात. पाण्याच्या वजनामुळे ढगांची घनता वाढते आणि वजन न पेलवल्यास ढग फुटतात आणि मुसळधार पाऊस पडतो. जिथे ढगफुटी होते, त्या प्रदेशात 100 मिमी प्रति तास या वेगाने पाऊस पडतो. ठराविक भागात ढगफुटी झाल्याने केवळ तेवढ्या भागातच मुसळधार पाऊस पडतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जास्त प्रमाणात ढगफुटीच्या घटना घडतात, अनेक वेळा ढगफुटीदरम्यान अनेकांचा मृत्यू देखील होतो.

छायाचित्रकार पीटर मायर यांनी ऑस्ट्रियातील मिलस्टाटर सरोवरावरील ढगफुटीची दृश्यं त्यांच्या कॅमेऱ्यात टिपली. हा व्हिडीओ पाहून लोकांना देखील आश्चर्य वाटलं. ढगफुटी होत असताना नेमकं कसं दृश्य दिसतं, ते पाहा...

ढग फक्त डोंगरावरच फुटतात का?

पूर्वी असा समज होता की ढगफुटी केवळ डोंगरावरच होते. पाण्याने भरलेले ढग डोंगराळ भागात अडकतात आणि पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे डोंगराळ प्रदेशात ढगफुटी होत असल्याचं मानलं जायचं. मात्र, डोंगराळ भाग सोडून इतर भागातही ढगफुटी झाल्याचे अनेक प्रसंग आहेत.

हेही वाचा:

Maharashtra: पावसाळ्यात कुठे फिरायला जायचं हा विचार करताय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special ReportMNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special ReportDevendra Fadanvis CM?|खुर्ची एक दावेदार अनेक,अजितदादांचा वादा शिंदेंना की फडणवीसांना? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget